For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मराठीची आठवण

10:36 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मराठीची आठवण
Advertisement

रमाकांत कोंडुस्कर : मराठी बाणा दाखविण्याची गरज

Advertisement

बेळगाव : केवळ निवडणुका आल्या की, राष्ट्रीय पक्षांना मराठी भाषा व भगव्या ध्वजाची आठवण होते. ज्यावेळी मराठी भाषिकांवर अन्याय होतो, छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना होते, त्यावेळी एक चकारही शब्द न काढणाऱ्या काँग्रेस व भाजपच्या नेत्यांना आता मात्र मराठी व छ. शिवाजी महाराजांची आठवण होऊ लागली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांना प्रतिकार करण्यासाठी म. ए. समिती लवकरच चांगला निर्णय जाहीर करेल, असा विश्वास म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी व्यक्त केला. मागील वर्षी मणगुत्ती येथे छ. शिवाजी महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेवेळी वाद निर्माण होता. सह्याद्रीनगर येथील शिवमूर्ती रातोरात हलविण्यात आली. तर बेंगळूर येथे शिवरायांच्या मूर्तीची विटंबना झाल्यानंतर बेळगावमध्ये म. ए. समितीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली तरी कोणत्याच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया दिली नाही. आता निवडणुका जाहीर होताच, राष्ट्रीय पक्षांना मराठी भाषा, छ. शिवाजी महाराज व भगव्या ध्वजाची आठवण होत आहे. मराठी भाषिकांनी अशा भूलथापांना बळी न पडता आपला मराठी बाणा या निवडणुकीतून दाखवून द्यावा. काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी आजवर म. ए. समितीचे आंदोलन चिरडण्याचाच प्रयत्न केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना जागा दाखवून देण्यात येईल, असा इशारा शहर म. ए. समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील यांनी दिला. यावेळी अॅड. अमर येळ्ळूरकर, महादेव पाटील, सागर पाटील यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.