महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्वातंत्र्य सैनिकाच्या त्यागाची आठवण ठेवा

11:52 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ठाणे सरपंच सरिता गावकर यांचे प्रतिपादन : ठाणे सरकारी माध्यमिक विद्यालयात मुक्तीदिन साजरा,गोवा दर्शन कार्यक्रम रंगला

Advertisement

वाळपई : स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण ठेवा. ते विसरू नका. गोवा मुक्तीचा इतिहास हा प्रत्येकाला माहित असणे गरजेचा आहे. स्वतंत्र सैनिकांचा आदर्श ठेवा. त्यांचे कार्य हे गोव्याच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. या मुक्त गोव्यामध्ये आज आपण स्वातंत्ररित्या काम करू शकतो, बोलू शकतो. व्यवसाय करू शकतो. हे सर्व स्वातंत्र्य हे स्वातंत्रसैनिकांमुळे प्राप्त झालेले आहे हे विसऊ नका, असे प्रतिपादन ठाणे पंचायतीच्या सरपंच सरिता गावकर यांनी केले आहे. ठाणे सरकारी माध्यमिक विद्यालयात गोवा मुक्तीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ नाईक, पंचसदस्य निलेश परवार यांची उपस्थिती होती. ठाणे सरकारी शाळेचे वरिष्ठ शिक्षक गणेश गावडे यांनी ध्वजारोहण केले व नंतर ‘गोवा दर्शन’ ही आगळी वेगळी स्पर्धा घेण्यात आली. ज्यामध्ये प्रत्येक वर्गात गोव्याचा स्वर्णीम इतिहास, विशिष्ट स्थळे, लोकनृत्य, लोकगीते,  तालुक्यातील स्वातंत्र्य सेनानी, प्रसिद्ध व्यक्तिमत्वे अशी माहिती सांगणारी भितीपत्रके तसेच निराळे देखावे उभारण्यात आले होते. नंतर पीपीटीद्वारे ते मुलांनी समजावले. त्याचप्रमाणे गोव्याची निरनिराळी लोकनृत्य देखील मुलांद्वारे सादर करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन कमिटी व पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी व सभासद देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी श्रुतिका गावस व सविता गवळी हिने केले तर आभार ओंकार कोरगावकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता शिक्षिका सुमित्रा कदम, शर्मिला फडते, भारती गावस, भारती देसाई, शर्मिष्ठा सावरशेकर व शिक्षक साईश नाईक, अक्षय सावंत यांचे विशेष योगदान लाभले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article