महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजेश खन्नांच्या ‘बावर्ची’चा रिमेक लवकरच

06:33 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अनुश्री मेहता यांचे दिग्दर्शन

Advertisement

मिसेस अंडरकवर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या अनुश्री मेहता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तयार आहेत. सुपरस्टार राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा सदाबहार चित्रपट ‘बावर्ची’चा रिमेक तयार करत असल्याची माहिती मेहता यांनी दिली आहे. या रिमेकचे चित्रिकरण सुरू झाल्याचे समजते.

Advertisement

1972 मध्ये प्रदर्शित बावर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शन ऋषिकेश मुखर्जी यांनी केले होते. तर अनुश्री मेहता आता स्वत:च्या शैलीत कौटुंबिक कॉमेडी ड्रामा चित्रपट मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी तयार आहेत. बावर्ची हा चित्रपट तपन सिन्हा यांचा 1966 मध्ये प्रदर्शित बंगाली चित्रपट ‘गाल्पा होलेओ सात्यी’चा रिमेक होता.

बावर्ची चित्रपटाच्या रिमेकची निर्मिती जादूगर फिल्म्स आणि समीर राज सिप्पी प्रॉडक्शन्सकडुन करण्यात येत ओह. बावर्ची हा चित्रपट मी अनेकदा पाहिला आहे. जुने चित्रपट अत्यंत प्रेरणादायी होते. मनमोहन देसाई आणि ऋषिकेश मुखर्जी यांची मी चाहती आहे. अमर अकबर अँथोनी, मिस्टर इंडिया, चुपके चुपके आणि विशेषकरून बावर्ची हा चित्रपट मला पसंत आहे. या चित्रपटांकडून मला बरेच काही शिकता आले, असे मेहता यांनी म्हटले आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article