महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पुणे पीपल्स बँकेच्या शाखेचे स्थलांतर

11:05 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्व-मालकीच्या इमारतीत खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते उद्घाटन

Advertisement

बेळगाव : पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि., पुणेच्या बेळगाव शाखेचे स्व-मालकीच्या इमारतीमध्ये स्थलांतर होऊन उद्घाटन करण्याचा मान देण्यात आला, ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. बँकेने भविष्यात 3 हजार कोटींचा टप्पा पार करून बेळगाववासीयांच्या आर्थिक गरजांना हातभार लाभो, अशा शुभेच्छा खासदार जगदीश शेट्टर यांनी दिल्या.

Advertisement

पुणे पीपल्स को-ऑप. बँक लिमिटेड, पुणे (मल्टीस्टेट बँक) शाखेचे संयुक्त महाराष्ट्र चौकातून रामदेव गल्ली येथील स्व-मालकीच्या इमारतीमध्ये स्थलांतर झाले आहे. या शाखेचे उद्घाटन करून खासदार शेट्टर बोलत होते. ते पुढे म्हणाले, आर्थिक विकासासाठी ही शाखा बेळगाववासीयांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जनतेला या शाखेचा उपयोग व्हावा व आर्थिक विकासाला मदत मिळावी. कोणत्याही परिस्थितीत आपण मदत करण्यास तत्पर असून राज्य व केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत मिळवून देऊ, असे त्यांनी सांगितले.

यावेळी अध्यक्ष जनार्दन रणदिवे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. 2012 मध्ये कॅथलिक बँक या संस्थेमध्ये विलीन करून शाखा सुरू करण्यात आली आहे. संस्थेमध्ये आता 25 कोटींच्या ठेवी असून विलीन झालेल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांना घेऊन संस्थेची वाटचाल सुरू आहे. आधुनिक गरजा ओळखून डिजिटलायझेशन, पारदर्शक व्यवहार व तत्पर सेवा देण्यात येत आहे. बेळगाववासीयांनी गेल्या 12 वर्षांपासून सहकार्य दिले आहे. यापुढेही असेच सहकार्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी को-ऑप. बँक असोसिएशनचे अध्यक्ष बाळाप्पा कग्गणगी, बाळासाहेब काकतकर, सुभाष ओऊळकर आदींनी विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. बँकेचे संचालक अॅड. सुभाष मोहिते, श्रीधर गायकवाड, डॉ. रमेश सोनवणे, बिपीनकुमार शहा, सुभाष गांधी, रोहित पोरवाल, विश्वनाथ जाधव, संजीव अस्वले, कालिदास शेलार, राजेंद्र गांगर्डे, अरुण डहाके, मुख्य व्यवस्थापक संजय भेंडवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article