महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ज्योतिरादित्य सिंदिया यांना दिलासा

06:29 AM Feb 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

साधारणत: पाच वर्षांपूर्वी 22 आमदारांसह काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात आलेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांना राज्यसभा निवडणूक प्रकरणात मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या राज्यसभेवरच्या निवडीला आव्हान देणारी याचिका फेटाळण्यात आली आहे.

Advertisement

ही याचिका काँग्रेस नेते तसेच माजी विरोधी पक्षनेते डॉ. गोविंदसिंग यांनी सादर केली होती. सिंदिया यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गुणा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता. त्यानंतर 2019 मध्येच त्यांनी 22 आमदारांचे बंड घडवून आणल्याने राज्यातील कमलनाथ यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार अल्पमतात आल्याने पडले होते. नंतर सिंदिया यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली होती. या निवडीला काँग्रेसने आव्हान दिले होते. निवडणुकीच्या आवेदन पत्रासोबत सिंदिया यांनी त्यांच्या मालमत्तेचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. सिंदिया यांच्या विरोधात एफआयआर सादर करण्यात आला होता. त्याविषयी त्यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपविली होती, असा काँग्रेसचा आरोप होता. मात्र, तो फेटाळला गेला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article