महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गाझावासीयांना इस्रायलकडून दिलासा

06:05 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भीषण युद्धादरम्यान दरोज काही वेळ युद्धविराम

Advertisement

वृत्तसंस्था/ जेरूसलेम

Advertisement

इस्रायल आणि हमास यांच्यात सातत्याने युद्ध सुरू आहे. इस्रायल तसेच हमास माघार घेत नसल्याने गाझावासीयांवर मोठे संकट ओढवले आहे. हमासने शनिवारी इस्रायलच्या सैनिकांना लक्ष्य करत मोठा हल्ला घडवू आणला. गाझाच्या दक्षिण भागात झालेल्या स्फोटात इस्रायलचे 8 सैनिक मारले गेले आहेत. गाझामध्ये आठ महिन्यांच्या लढाई एखाद्या दिवशी मारले गेलेल्या इस्रायली सैनिकांची ही दुसरी मोठी संख्या आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात एका दिवसात 21 सैनिक मारले गेले होते.

या युद्धादरम्यान इस्रायलच्या सैन्याने आता रविवारी महत्त्वाची घोषणा केली आहे. दक्षिण गाझाच्या काही हिस्स्यांमध्ये सैन्याची कारवाई दररोज काही वेळासाठी रोखली जाणार आहे. संबंधित भागात अधिक मदतसामग्री पोहोचावी याकरता इस्रायलच्या सैन्याने हे पाऊल उचलले आहे. आंतरराष्ट्रीय सहाय्य संघटनांनी या भागात मानवीय संकट तीव्र झाल्याचा इशारा दिला होता. तर हमासने देखील सामरिक विरामासाठी संमती दर्शविली आहे.

राफावरील लढाई सुरू राहणार

राफा शहरातील लढाई जारी राहणार असल्याचे इस्रायलच्या सैन्याने स्पष्ट केले आहे. या शहरात इस्रायलचे सैन्य हमासच्या ब्रिगेडला लक्ष्य करत आहे. केरेम शालोम क्रॉसिंगवरून सलाह अल-दीन रोड आणि उत्तर दिशेला जाणाऱ्या रस्त्यावर सैन्यकारवाई पुढील नोटीसपर्यंत प्रतिदिन पहाटे 5 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत रोखण्यात येतील असे सैन्याकडून म्हटले गेले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article