महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शिरगावातील विद्यार्थ्यांची त्रासातून मुक्तता

12:39 PM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सरकारी प्राथमिक शाळा नवीन इमारतीचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्याहस्ते उद्घाटन

Advertisement

डिचोली : शिरगावातील सरकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा त्रास आता संपणार आहे. छप्पर नादुऊस्त बनल्याने धोकादायक बनलेल्या शाळा इमारतीला आता नवीन साज दिला आहे. या बहुचर्चित सरकारी प्राथमिक शाळेची जर्जर बनलेली इमारत अखेर आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्याने दुरूस्त करून तयार झाली आहे. या शाळा इमारतीचे उद्घाटन आमदार प्रेमेंद्र शेट यांच्याहस्ते करण्यात आले. या शाळा इमारतीच्या छप्पराला गळती लागल्याने पावसात पाणी आत गळत होते. तसेच इमारतीच्या भिंतीही धोकादायक बनल्या होत्या. जमीन ओली राहत असल्याने विद्यार्थ्यांना सर्दीचा त्रास होत होता. या इमारतीची बिकट परिस्थिती पाहून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी गेल्यावर्षी या इमारतेच्या छप्परावर प्लास्टिकचे आच्छादन घातले होते. तरीही पावसाचे पाणी आत येतच असल्याने या इमारतीतील विद्यार्थ्यांना देवस्थानच्या खोलीत स्थलांतरित केले होते.

Advertisement

या शाळेची इमारत नव्याने साकारण्यात यावी यासाठी पालक शिक्षक संघाने आमदार, शिक्षण खात्याकडे पत्रव्यवहार केला होता, निवेदने सादर केली होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे या इमारतीच्या कामाला थोडा उशीर झाला. तरीही आमदार प्रेमेंद्र शेट यांनी या इमारतीच्या डागडुजीच्या कामासाठी पाठपुरावा चालूच ठेवला. अखेर सार्वजनिक बांधकाम खात्याने या इमारतीच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. 48 लाख रूपये खर्च करून इमारतीला नवीन साज देण्यात आला. या शाळा इमारतीचे काम होऊन तिला नवीन साज चढविण्यात आल्याने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही समाधान व्यक्त केले. शाळेला नवीन साज दिल्याने याच शाळेत आमच्या मुलांना पाठवणार अशी भावना शिरगावातील पालकांनी व्यक्त केली. शिरगावातील शाळेची दुरूस्ती करून विद्यार्थी व शिक्षकांना संरक्षण प्राप्त करून देणे ही आपली जबाबदारी होती. त्यादृष्टीने आपण सातत्याने पाठपुरावा चालूच ठेवला होता. त्यामुळेच या शाळा इमारतीचे दुरूस्तीकाम आज पूर्ण होऊन ती विद्यार्थी व शिक्षकांना वापरासाठी सज्ज झालेली आहे असे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article