महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेअर बाजारात अंतिम सत्रात दिलासा

06:16 AM Jan 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्सची 500 अंकांवर उसळी : निफ्टीही 160 वर वधारला : आशियामधील वातावरणाचा लाभ

Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisement

चालू आठवड्यातील भारतीय भांडवली बाजारात मागील काही सत्रांमध्ये घसरणीचा कल राहिल्याचे दिसून आले होते. मात्र अंतिम सत्रात शुक्रवारी मात्र बाजारातील बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांच्या निर्देशांकांनी तेजी प्राप्त करुन गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा दिल्याचे दिसून आले. यावेळी सलग तिसऱ्या सत्रात एचडीएफसीची घसरण कायम राहीली होती.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 496.37 अंकांनी वधारुन निर्देशांक 71,683.23 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 160.15 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 21,622.40 वर बंद झाला आहे.

आशियामधील बाजारांमध्ये मिळताजुळता कल राहिल्याच्या दरम्यान आर्थिक आणि आयटी क्षेत्रातील समभागांमधील सुधारणात्मक स्थितीचा लाभ घेत देशातील शेअर बाजार शुक्रवारी वधारुन बंद झाले आहेत. यामध्ये एचडीएफसी बँकेसह बँकिंग क्षेत्रात घसरणीचा कल राहिला होता.

मुख्य कंपन्यांच्या मदतीने दूरसंचार कंपनी भारती एअरटेलचे समभाग 5 टक्क्यांनी वधारुन ते 1,136 रुपयांच्या उच्चांकावर राहिले आहेत. सोबतच टायटन, अॅक्सिस बँक, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेस, विप्रो, इन्फोसिस आणि आयटीसीसह एचसीएल टेक यांचे समभाग तेजीसह बंद झाले.

अन्य कंपन्यांमध्ये बँकिंगचे समभाग पुन्हा घसरणीत राहिले आहेत. आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँक वगळता बीएसईमधील समावेश असणाऱ्या इंडसइंड बँक, स्टेट बँक, एचडीएफसी बँक, कोटक बँक यांचे समभाग घसरणीत राहिले.

जागतिक बाजारांची स्थिती

अमेरिकेतील शेअर बजारात गुरुवारी रात्री वधारुन बंद झाले. नॅस्डॅक 1.35 टक्क्यांनी वधारुन बंद झाला. डोव जोन्स आणि एसअॅण्ड पी 500 हे वधारले आहेत. आशियातील बाजारांमध्ये सकाळची घसरण थांबली. यामुळे याचा लाभ हा भारतीय शेअर बाजाराला शुक्रवारी झाल्याचे पहावयास मिळाले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article