महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिलासा

06:33 AM Mar 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एमबीबीएसची पदवी प्राप्त करण्याची मिळणार संधी

Advertisement

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

Advertisement

युक्रेनमधील युद्धामुळे भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. या विद्यार्थ्यांना आता भारतातही एमबीबीएसची पदवी प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे. परंतु ही संधी केवळ एकदाच मिळणार आहे. यासंबंधी केंद्र सरकारने मंगळवारी घोषणा केली आहे. युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या अंतिम परीक्षेत सामील होण्याची संधी दिली जाणार असल्याचे केंद्र सरकारकडून म्हटले गेले आहे.

विद्यार्थ्यांना कुठल्याही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नामांकनाशिवाय एमबीबीएस पार्ट 1 आणि पार्ट 2 परीक्षेत उत्तीर्ण होण्याची अंतिम संधी दिली जाणार आहे. थ्योरी परीक्षा भारतीय एमबीबीएस परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल तर प्रॅक्टिकल परीक्षा काही नामनिर्देशित शासकीय महाविद्यालयांमध्ये आयोजित केली जाणार असल्याचे सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला कळविण्यात आले आहे.

युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न घेता एमबीबीएस अंतिम, भाग 1 आणि भाग 2 परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यावर 2 वर्षांची अनिवार्य रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण करावी लागणार आहे. यातील पहिले वर्ष मोफत स्वरुपातील असेल तर दुसऱया वर्षासाठी मानधन दिले जाणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले.

याप्रकरणी स्थापन समितीने हा पर्याय कठोरपणे केवळ एकदाच उपलब्ध करण्यात यावा आणि भविष्यात या पर्यायाला आधार ठरविले जाऊ नये असे मत व्यक्त केले असल्याचे केंद्र सरकारने नमूद केले आहे. केंद्र सरकारने भूमिका मांडल्यावर सर्वोच्च न्यायालयाने युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिका निकालात काढल्या आहेत. मागील वर्षी मार्चमध्ये युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा अशी मागणी करणाऱया याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या.

युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना भारतीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्sय प्रवेश देणे शक्य नाही, परंतु त्यांना 2 हिस्स्यांमध्ये परीक्षा देत पदवी प्राप्त करण्याची संधी दिली जाणार आहे. युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाची अखेरची दोन वर्षे शिल्लक असलेल्या विद्यार्थ्यांनाच ही सुविधा दिली जात असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article