For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांना दिलासा

11:07 AM Dec 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
ऊर्जामंत्री के  जे  जॉर्ज यांना दिलासा
Advertisement

स्मार्ट विद्युत मीटर टेंडर घोटाळा प्रकरण : उच्च न्यायालयाकडून खासगी तक्रार रद्द

Advertisement

बेंगळूर : स्मार्ट मीटर टेंडर घोटाळाप्रकरणी ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांच्यासह इतर काही जणांविऊद्ध दाखल झालेल्या खासगी तक्रारी उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केल्या आहेत. त्यामुळे मंत्री जॉर्ज यांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्मार्ट विद्युत मीटर जोडणी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी खासगी तक्रार दाखल दाखल केली होती. सदर तक्रार रद्द करावी, अशी याचिका जॉर्ज यांनी दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती एम. आय. अऊण यांच्या नेतृत्त्वातील पीठाने खासगी तक्रार रद्द करण्याचा आदेश दिला.

ऊर्जा खात्याचे गौरव गुप्ता, बेस्कॉमचे दिवंगत महांतेश बिळगी आणि एच. जे. रमेश यांच्याविऊद्ध दाखल केलेले खटलेही रद्द करण्यात आले आहेत. स्मार्ट विद्युत मीटर प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप करत भाजपने ऊर्जा खात्याविऊद्ध कायदेशीर लढा हाती घेतला होता. इतर कंपन्यांना वगळून  इतर कंपन्यांना डावलून हे कंत्राट दावणगेरे येथील राजश्री इलेक्ट्रिकल्स कंपनीला देण्यात आले होते, असा आरोप भाजपने केला होता.

Advertisement

विविध राज्यांमध्ये स्मार्ट विद्युत मीटर 900 ऊपयांना उपलब्ध आहेत. पण ते ग्राहकांना 5,000 ते 10,000 ऊपयांना दिले जात आहेत. हा एक मोठा गैरव्यवहार असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. स्मार्ट मीटर निविदा सुमारे 10 कोटींची असल्याने जागतिक निविदा मागवायला हवी होती. पण फक्त 354 कोटी ऊपये व्यवसाय करणाऱ्या राजश्री इलेक्ट्रिकल्सला ही निविदा देण्यात आली होती, असा आरोपही भाजपने तक्रारीत केला होता.

Advertisement
Tags :

.