Sangli : सांगलीत जलजीवन मिशनच्या ठेकेदारांना दिवाळीपूर्वी दिलासा
जलजीवन मिशनचे ठेकेदार आर्थिक ताणाखाली
सांगली : जलजीवन मिशन योजनेची कोट्यवधी रुपयांची बिले थकित आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शासनाने १६९९ कोटी रुपये निधी वितरित केला आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यासाठी १५ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, सहा महिन्यांपासून अनुदानाकडे लक्ष लागलेल्या ठेकेदारांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यात मागील पाच वर्षापासून जलजीवन मिशनची कामे सुरु आहेत. जिल्ह्यातील जलजीवन योजनेच्या कामांची थकबाकी सुमारे ६० कोटी रुपयांहून अधिक आहे. ती मिळावी यासाठी गेल्या वर्षभरापासून ठेकेदारांचा पाठपुरावा सुरु आहे. थकबाकीमुळे प्रचंड आर्थिक कोंडी झालेल्या बाळवा तालुक्यातील एका उपकंत्राटदाराने आत्महत्याही केली होती. त्यानंतर राज्यभरात ठेकेदारांचा उद्रेक झाला होता. त्यानंतरही शासनाने थकबाकी देण्याच्या हालचाली झाल्या
नाहीत. थकित बिले मिळत नसल्याने ठेकेदारांनी सर्वत्र योजनेची कामे बंद ठेवली आहेत. आठवड्यात याची दखल घेत गेल्या शासनाने १६९९ कोटी रुपयांचा निधी वितरित केला. तो सर्व जिल्हा परिषदांना प्राप्त झाला असून ठेकेदारांची बिले अदा करण्याचे काम सुरु झाले आहे. यातून सर्व ठेकेदारांना १०० टक्के बिले मिळणार नसली, तरी काही प्रमाणात तरी दिलासा मिळाला आहे.
सद्यस्थितीत राज्य शासनाकडून निधी वितरित करण्यात आल आहे. केंद्राचा बाटा अद्याप मिळालेला नाही. तो आल्यानंतर आणखी काही बिले मिळू शकतील. सध्या बिले मिळाली, तरी कंवाटदार कामे पुन्हा सुरु करण्याच्या मनस्थितीत नाहीत. अद्याप मोठ्या प्रमाणात बिले थकीत असल्याने कामांवर खर्च करण्याची त्यांची तयारी नसल्याचे चित्र दिसत आहे. थकित बिलांमुळे अनेक ठेकेदारांनी कामे बंद ठेवली