रिलायन्सचे समभाग 4 टक्के वधारले
07:00 AM Jul 21, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : दूरसंचार, रिटेल क्षेत्रातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे समभाग बुधवारी शेअर बाजारात 4 टक्के इतके वधारल्याचे दिसून आले. सरकारने अलीकडेच डिझेल व हवाई इंधनावरील करात कपातीची घोषणा केली होती, त्याचा रिलायन्सच्या समभागावर परिणाम दिसल्याचे तज्ञांनी सांगितले. याचप्रमाणे सरकारने देशांतर्गत कच्च्या तेल उत्पादनावरील करातही कपात करण्याची घोषणा केली आहे. 4 टक्के वाढीसह कंपनीचा समभाग 2,545 रुपयांवर बाजारात व्यवहार करत होता.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article