रिलायन्सकडून कच्च्या तेलाच्या आयातीत 17 टक्के वाढ
वृत्तसंस्था/ मुंबई
दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिज यांनी रशियाकडून मार्चमध्ये 17 टक्के अधिक कच्च्या तेलाची आयात केली असल्याची माहिती आहे. मार्चमध्ये कंपनीने दर दिवसाला जवळपास 5,32,700 बॅरेल्स इतके कच्चे तेल रशियातून आयात केले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत आयातीत 17 टक्के वाढ झाली आहे. एकंदर तेलाच्या आयातीत पाहता रिलायन्स 48 टक्के तेल आयात करते. पण एकंदर महिन्याच्या तेलाच्या आयातीत पाहता 19 टक्के आयात कमी होऊन 1.1 दशलक्ष प्रति बॅरल प्रति दिवस इतकी राहिली आहे. रशियातील तेल फर्म रोडनेफ्ट रिलायन्सला कच्च्या तेलाची निर्यात करते.
भारताने मार्चमध्ये 5.3 दशलक्ष बॅरल्स इतक्या तेलाची प्रति दिवशी आयात केली आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत 1.3 टक्के वाढ आयातीत दिसली आहे. वर्षाच्या आधारावर मागच्या मार्चच्या तुलनेत आयात 3.8 टक्के वाढली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताने 4.88 दशलक्ष बॅरल प्रति दिवशी कच्च्या तेलाची आयात केली होती. आधीच्या वर्षाच्या तुलनेत 5 टक्के वाढ झाली आहे.