For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिलायन्सचा स्वस्तातला 5 जी स्मार्टफोन लवकरच

06:21 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
रिलायन्सचा स्वस्तातला 5 जी  स्मार्टफोन लवकरच
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

देशातील दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून लवकरच स्वस्तातला 5जी स्मार्टफोन सादर केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सदरचा स्मार्टफोन रिलायन्स जिओ ही कंपनी चिप निर्माती कंपनी क्वॉलकॉमसोबतच्या सहकार्याने सादर करणार आहे. सदरच्या स्मार्टफोनची किंमत 9 हजार रुपयांच्या घरात असणार असल्याचेही सांगितले जात आहे. दोन्ही कंपन्या सदरच्या स्मार्टफोन सादरीकरणासाठी एकत्रितपणे प्रकल्पावर काम करत आहेत. क्वॉलकॉमची चीपसेट असणारा रिलायन्सचा 5 जी स्मार्टफोन कॅलेंडर वर्षाच्या अखेरपर्यंत भारतीय बाजारात उतरविला जाईल, असेही सांगितले जात आहे. नव्या स्मार्टफोनच्या बाजारात दाखल होण्यानंतर अनेक 2 जी वापरकर्ते 5जीचा वापर करण्याकडे वळतील, अशी शक्यताही सांगितली जात आहे. मोबाईल स्मार्टफोनच्या विकासासाठी दोन्ही कंपन्यांचे योगदान मोठ्या प्रमाणात राहणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.