For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रावळगाव शुगर फार्मचे रिलायन्स करणार अधिग्रहण

06:41 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
रावळगाव शुगर फार्मचे रिलायन्स करणार अधिग्रहण
Advertisement

27 कोटी रुपयांमध्ये होणार व्यवहार : पानपसंद टॉफी बनवणारी कंपनी

Advertisement

वृत्तसंस्था/ नाशिक

पानपसंद ही लोकप्रिय टॉफी बनवणाऱ्या रावळगाव शुगर फार्मचे देशातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज अधिग्रहण करणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील रावळगावमधील या कंपनीचे अधिग्रहण 27 कोटी रुपयांच्या व्यवहारामधून करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 1990 पासून लहान मुलांना रावळगावची पान पसंद ही टॉफी आवडत आली आहे. चक्क पानासारखाच अप्रतिम स्वाद असणारे ही टॉफी अल्पावधीत सर्वत्र लोकप्रिय झाली.  अधिग्रहणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार स्थावर मालमत्ता, जमीन, इमारत, इक्विपमेंट व मशिनरी यांचा ताबा रावळगाव शुगर फार्मकडेच राहणार असल्याचे समजते. ट्रेडमार्क, रेसिपीज आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी संदर्भातील हक्क कंपनी आपल्या ताब्यात घेणार आहे.

Advertisement

कंपनीवर अडचणीचे ढग

अलीकडच्या काळामध्ये रावळगाव शुगर फार्म कंपनीला आपला व्यवसाय चालवणे स्पर्धेच्या युगामध्ये कठीण झाले होते. संघटित आणि असंघटित दोन्ही क्षेत्रांमध्ये वाढलेल्या स्पर्धेमुळे रावळगावने अलीकडे बाजारातील वाटा घटल्याचे दिसून आले होते. त्यामुळे कंपनीवर चिंतेचे ढग होते. कच्च्या मालासाठी येणारा खर्च, त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचा खर्च तसेच ऊर्जा वापरासाठी येणारा खर्च कंपनीसाठी चिंतादायक ठरू लागला होता. परिणामी कंपनीने रिलायन्स कंपनीला अधिग्रहणासाठी तयारी दर्शवली असल्याचे समजते.

कधी झाली सुरुवात

पानपसंद, मॅंगो मूड आणि कॉफी ब्रेक या कँडी कंपनी विकत होती. 1933 मध्ये महाराष्ट्रामध्ये वालचंद हिराचंद यांनी 1933 मध्ये नाशिक जिह्यातील रावळगाव येथे एक साखर कारखाना सुरू केला होता. 1942 मध्ये कंपनीने रावळगाव ब्रँड नावाने पॅंडी बनवण्याचा उद्योग सुरू केल. कंपनीअंतर्गत बाजारामध्ये मँगो मूड, कॉफी ब्रेकसह नऊ उत्पादनांची विक्री करते.

Advertisement
Tags :

.