‘रिलायन्स जिओ’ने 79.6 लाख ग्राहक गमावले
सलग तिसऱ्या महिन्यांमध्ये घसरण सुरुच : ट्रायच्या आकडेवारीमधून स्पष्ट
वृत्तसंस्था/ मुंबई
दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असणारी रिलायन्स जिओ कंपनीने सलग तिसऱ्या महिन्यांत आपले ग्राहक गमावले आहेत. सप्टेंबरमधील आकडेवारीनुसार जवळपास 79.6 लाख ग्राहकांना जिओला गमावावे लागले आहे. अशी माहिती भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) यांनी संपूर्ण आकडेवारीसह सादर केली आहे.
दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी रिलायन्स जिओने ग्राहकांना गमावण्याची स्थितीत जुलैमध्येही घसरण राहिल्याचे दिसून आले. दुसऱ्या बाजूला देशातील तीन खासगी दूरसंचार कंपन्यांमध्ये जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांनी आपला टॅरिफमध्ये मोठी वाढ ठेवली आहे.
यावेळी जिओच्या ग्राहकांची संख्या मागील दोन महिन्यांच्या कालावधीत जादा राहिली आहे. मागील दोन महिन्यांमध्ये जिओची साथ 40.1 लाख आणि 7.60 लाख ग्राहकांनी साथ सोडली. तर एकूण मिळून मागील तीन महिन्यांमध्ये दूरसंचार कंपनीने 1.27 कोटी ग्राहक गमावण्याची नामुष्की जिओ कंपनीनवर आली आहे. तसेच जूनच्या अंतिम टप्यापर्यंत 47.65 कोटी ग्राहकांसह 2.6 टक्क्यांनी ग्राहक कमी झाले आहेत.
अन्य कंपन्यांची स्थिती
-मागील तीन महिन्यांमध्ये एअरटेलने 55.3 लाख ग्राहक गमावले
-आर्थिक संकटांचा समान करणारी कंपनी व्हीआयने सप्टेंबरमध्ये 15.5 लाख ग्राहक सोडून गेले
बीएसएनएलने जोडले नवे ग्राहक
दरम्यान सरकार मालकी असणारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड यांनी खासगी दूरसंचार कंपन्या सोडलेले ग्राहक आपल्याकडे वळविण्यात यश मिळवले आहे. सलग दोन वर्षांमध्ये बीएसएनएलने जुलैमध्ये 29 लाख व ऑगस्टमध्ये 25.3 लाख ग्राहक जोडले असल्याची माहिती आहे.