रिलायन्स जिओचे 2 फोन सादर
ग्राहकांना दिवाळी भेट : इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये केले लाँचिंग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिलायन्स जिओ या कंपनीने आपल्या ग्राहकांना दिवाळीसाठी खास गिफ्ट दिले आहे. रिलायन्स जिओने इंडिया मोबाईल काँग्रेस (आयएमसी) 2024 मध्ये 2 नवीन 4 जी फीचर असणारे फोन लाँच केले आहेत. लाँच केलेले दोन्ही 4 जी फीचर फोन ‘जिओ भारत’ आवृत्ती अंतर्गत लॉन्च करण्यात आले आहेत. जिओ भारत व्ही3 आणि व्ही4 अशी या दोन फीचर फोनची नावे आहेत.
गेल्या वर्षी रिलायन्स जिओने ‘जिओ भारत’ आवृत्ती अंतर्गत व्ही2 फोन लॉन्च केला होता, जो लोकांना खूप आवडला होता. आता बघूया जिओ भारत ही मालिका व्ही3 आणि व्ही 4 लोकांना किती आवडते.
जिओ भारत सर्व्हिस व्ही3, व्ही4 4 जी फिचर्ससोबत फोन येणार आहेत. यामध्ये फोनची किंमत ही 1019 पासून सुरु होणार आहे. लवकरच जिओचे जिओ इंडिया व्ही 3 आणि व्ही4 फोन लवकरच मोबाईल स्टोअर्स तसेच जिओ मार्ट आणि अॅमेझॉनवर ग्राहकांच्यासाठी उपलब्ध होणार आहे.
वैशिष्ट्यो काय
जिओ भारत व्ही3 आणि व्ही 4 फोन नवीनतम डिझाइनसह येणार आहे. या फोनमध्ये 1000 एमएएच बॅटरी, 128 जीबीपर्यंत वाढवता येणारे स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये तुम्हाला 23 भारतीय भाषा वापरता येण्याचा पर्याय दिलेला आहे. यासह जिओ भारत फोन फक्त 123 रुपयांमध्ये मासिक रिचार्ज केला जाऊ शकतो, ज्यामध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 14 जीबी डेटा मिळणार असल्याची माहिती आहे.