For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिलायन्स जिओने जोडले जुलैत सर्वाधिक ग्राहक

06:17 AM Sep 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
रिलायन्स जिओने जोडले जुलैत सर्वाधिक ग्राहक
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दूरसंचार नियामक ट्राय यांच्या माहितीनुसार जुलै 2025 मध्ये रिलायन्स जिओने सर्वाधिक मोबाईल ग्राहक जोडलेले आहेत. रिलायन्स जिओने जुलै महिन्यामध्ये 4.83 लाख नवे मोबाईल ग्राहक जोडले आहेत. यानंतर भारती एअरटेलने 4.64 लाख नवे मोबाईल ग्राहक जोडले असल्याचेही समजते. याच दरम्यान वोडाफोन आयडियाच्या ग्राहक संख्येमध्ये मात्र घट झालेली दिसून आली. यामुळे कंपनीची चिंता अधिकच वाढताना दिसली आहे. ट्रायने दिलेल्या माहितीनुसार 2025 जुलै अखेर वायरलेस सबक्राईबरची संख्या 1171.91 दशलक्ष इतकी पोहोचली आहे. वोडाफोन आयडियाच्या ग्राहक संखेमध्ये घसरण पाहायला मिळाली असून जुलै महिन्यामध्ये 3.59 लाख मोबाईल ग्राहक कमी झालेले दिसून आले.

ब्रॉडबँड ग्राहकसंख्या

Advertisement

जिओ आणि एअरटेल ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या वाढलेली दिसून आली. या सोबतच सरकारी दूरसंचार कंपन्या बीएसएनएल आणि एमटीएनएल यांच्या सबक्राईबर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. जुलैमध्ये बीएसएनएलने 1.01 लाख ग्राहक गमावले आहेत. जुलै महिन्यामध्ये ब्रॉडबँड आणि वायर लाईन कनेक्शनमध्ये मजबुती पाहायला मिळाली. जुलै अखेरपर्यंत ब्रॉडबँड सबक्राईबरची संख्या 939.20 दशलक्ष (वायरलेस) आणि 45.49 दशलक्ष (वायरलाईन) झाली आहे.

Advertisement
Tags :

.