रिलायन्स इंडस्ट्रीज 7 टक्क्यांनी मजबूत
बाजारमूल्य 19.5 लाख कोटी रुपयांच्या घरात
मुंबई :
रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) च्या समभागाने इंट्राडे ट्रेडमध्ये 7.2 टक्क्यांनी वाढत 2,905 रुपयांचा नवा उच्चांक गाठला. या वाढीमुळे कंपनीचे बाजार भांडवल 19.5 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.
आरआयएलची मागील सर्वोच्च पातळी 15 जानेवारी 2024 रोजी रु. 2,792.65 रुपये होती. शेवटी 6.8 टक्क्यांच्या वाढीसह 2,896 रुपयांवर बंद झाला, तर सेन्सेक्स 1.7 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. आरआयएलने 10 सप्टेंबर 2020 पासून एक दिवसाची सर्वात मोठी वाढ नोंदवली आहे.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) वर उपलब्ध डेटा दर्शविते की बंद किंमतीनुसार, आरआयएलचे बाजार भांडवल 19.59 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे आणि 20 लाख कोटी रुपयांच्या लक्ष्यापासून ते फक्त 2 टक्के दूर आहे.
सध्या जिओ फायनान्शियलचे बाजार भांडवल 1.59 लाख कोटी आहे. यापूर्वी, 19 जुलै 2023 रोजी, आरआयएलचे बाजार भांडवल 19.21 लाख कोटी रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. गेल्या तीन महिन्यांत आरआयएल 28 टक्के वाढला आहे, या काळात सेन्सेक्स 13 टक्के वाढला आहे. आर्थिक वर्ष 24 च्या तिसऱ्या तिमाहीत आरआयएलचा एकत्रित निव्वळ नफा एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 9.3 टक्क्यांनी वाढला आहे. 17,265 कोटी रुपये इतका तो झाला आहे आणि महसूल 3.9 टक्क्यांनी वाढून 2.25 लाख कोटी रुपयांचा झाला आहे.
ओसवाल एजन्सीच्या मते
जागतिक तेलाची मागणी मजबूत राहण्याची अपेक्षा आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने आपल्या ताज्या अपडेटमध्ये म्हटले आहे की, ‘कॅलेंडर वर्ष 2024 साठी जागतिक तेलाची मागणी दररोज 103 दशलक्ष बॅरलपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ओपेक उत्पादन कपात आणि भू-राजकीय संघर्षांमुळे किमती आणि मार्जिन वाढू शकतात.