महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तिलारी धरणातील वाया जाणारे पाणी मार्कंडेय नदीपात्रात सोडा

10:45 AM Aug 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन : तुडये येथे बैठक घेऊन निर्णय घेण्याची मागणी

Advertisement

वार्ताहर/उचगाव

Advertisement

कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीलगत तिलारीचे मोठे धरण असून या धरणातील काही पाण्याचा भाग वायफळ जंगल भागात जात असतो. सदर पाणी जर कर्नाटकातील जवळच असलेल्या मार्कंडेय नदीच्या पात्रात सोडला तर बेळगावचा पश्चिम भाग आणि पूर्व भागातही या पाण्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊन उत्पादनात नक्की वाढ होईल, तसेच बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिंडलगा पंपिंग स्टेशनलासुद्धा या पाण्याचा साठा होऊन भविष्यात बेळगाव शहरालाही मुबलक पाणीपुरवठा होईल. यासाठी सदर पाणी मार्कंडेय नदीच्या पात्रात सोडावे, या आशयाचे निवेदन खासदार जगदीश शेट्टर यांना बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्यावतीने देण्यात आले.

तिलारी धरणाला लागून पुढे असलेल्या अनेक गावांनासुद्धा याचा उपयोग होणार आहे. यासाठी तुडये ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी तसेच बेळगाव तालुक्मयातील विविध गावातील शेतकऱ्यांनी खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन सदर परिसर आणि मार्कंडेय नदी व तिलारी डॅम आणि या धरणातून वायफळ जाणारे पाणी यासंदर्भात माहिती दिली. यावेळी तुडये सरपंच विलास सुतार, माजी सरपंच माऊती पाटील यावेळी उपस्थित होते. तसेच पुंडलिक पावशे, पुंडलिक मोरे, महेश कोळुचे, निंगाप्पा जाधव, विलास सुतार, नेताजी बेनके, सुरज सुतार याप्रसंगी उपस्थित होते.

ऐन उन्हाळ्यात नदी कोरडी

मार्कंडेय नदीचा उगम जरी महाराष्ट्र राज्यामध्ये झालेला असला तरी सदर नदी ही कर्नाटकातून वाहत जाते. राकसकोप, सोनोली, बेळगुंदी, कल्लेहोळ, उचगाव, सुळगा, आंबेवाडी, मण्णूर यासह पुढे कंग्राळी अशा भागातून ही नदी जात असल्याने नदीच्या दुतर्फा हजारो एकर जमीन असून या जमिनीमध्ये उन्हाळा, पावसाळा वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात. मात्र ऐन उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेला पिकांना पाण्याची नितांत गरज असते. याचवेळी मार्कंडेय नदीचे पात्र कोरडे पडलेले असते. तिलारी धरणामध्ये पाण्याचा मुबलक साठा असून या धरणातील बरेचसे पाणी हे रोज वायफळ जात असते. तेच पाणी जर मार्कंडेय नदीच्या पात्रात सोडले तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना याचा लाभ होऊन शेतकऱ्यांच्या पिकांची भरघोस वाढ होईल. यासंदर्भात दिल्ली येथे कोल्हापूर जिह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार तसेच बेळगाव जिह्याचे खासदार, आमदार यांची बैठक झालेली होती आणि या बैठकीमध्ये या तिलारी धरणातील पाणी मार्कंडेय नदीत सोडण्यासंदर्भात चर्चा झाली होती. मात्र निवडणुकीनंतर हा प्रश्न रेंगाळलेला आहे. खासदार, आमदारांची निवड झाल्याने हा प्रश्न राहून गेला. सदर प्रश्न पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी उचलून धरला असून या धरणातील पाणी मार्कंडेय नदीच्या पात्रात सोडावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा करावी

बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर आणि चंदगड तालुक्मयाचे आमदार राजेश पाटील यासह कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज या सर्वांची एक संयुक्त बैठक घेऊन तुडये येथील शेतकरी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त बैठकीमध्ये या संदर्भात विचार विनिमय करून तातडीने यावर निर्णय घ्यावा, आणि तिलारी धरणातील पाणी मार्कंडेय नदीत सोडावे आणि बेळगाव तालुक्मयातील नदीच्या परिसरातील शेती सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी जोरदार मागणी या भागातील शेतकरी व नागरिकांतून करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article