For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑर्थो अॅण्ड ट्रॉमा सेंटरची एमजेपीजेएवायअंतर्गत नोंदणी

12:25 PM Nov 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
ऑर्थो अॅण्ड ट्रॉमा सेंटरची एमजेपीजेएवायअंतर्गत नोंदणी
Advertisement

डॉ. देवेगौडा इमागौडनावर यांची माहिती : योजनेंतर्गत रुग्णांवर होणार मोफत उपचार-शस्त्रक्रिया

Advertisement

बेळगाव : समाजातील गोरगरिबांना उत्कृष्ट आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बेळगाव शहरात श्री ऑर्थो अॅण्ड ट्रॉमा सेंटरची स्थापना करण्यात आली. हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. नुकताच महाराष्ट्रातील महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत (एमजेपीजेएवाय) श्री ऑर्थो अॅण्ड ट्रॉमा सेंटरची अधिकृत नोंदणी करण्यात आली असून आता हॉस्पिटलच्या माध्यमातून सीमाभागासह महाराष्ट्रातील रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. देवेगौडा इमागौडनावर यांनी केले आहे.

कर्नाटकामहाराष्ट्र सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि परवडणारी करण्याच्या उद्देशानेच श्री ऑर्थो अॅण्ड ट्रॉमा सेंटर सुरू करण्यात आले आहे. आता हॉस्पिटलच्या कामगिरीत महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची भर पडली आहे. या योजनेचा केवळ महाराष्ट्रातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज येथील रुग्णांना तर लाभ होणारच आहे, शिवाय बेळगाव, ग्रामीण, खानापूर, हुक्केरी, चिकोडी, निपाणी, अथणी सीमेजवळील सर्व गावांच्या बीपीएल-एपीएल कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Advertisement

या योजनेंतर्गत हाड, मणक्यासह इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. रेशनकार्ड व कुटुंबातील सदस्यांचे आधारकार्ड व इतर कागदपत्रांद्वारे रुग्णांना उपचार घेता येणार असून रुग्णांवर 5 लाखांपर्यंत मोफत उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय 1356 पेक्षा अधिक उपचार, शस्त्रक्रिया व वैद्यकीय प्रक्रियांचा लाभही घेता येणार आहे. श्री ऑर्थो अॅण्ड ट्रॉमा सेंटरमध्ये 24 तास आपत्कालीन व ट्रॉमा केअर, डिजिटल एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय, फिजिओथेरपी, 24×7 फार्मसी, अनुभवी डॉक्टर्स, न्यूरो, जनरल सर्जन व युरोलॉजिस्ट विभागातही उत्तम टीम कार्यरत आहे. सरकारी व खासगी आरोग्य विमा योजना उपलब्ध आहेत.

योजनेंतर्गत होणाऱ्या शस्त्रक्रिया-उपचार

अपघात आणि आपत्कालीन शस्त्रक्रिया, ऑर्थोपेडिक, पॉलिट्रॉमा, जॉईंट रिप्लेसमेंट, ऑथ्रोस्कॉपी, मणक्मयाची शस्त्रक्रिया, न्यूरो सर्जरी, बाल ऑर्थोपेडिक्स, इलिझारोव्ह प्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, स्ट्रोक व न्यूरो रिहॅबिलिटेशन, जनरल सर्जरी, युरोलॉजी, लॅप्रोस्कॉपी, जनरल मेडिसीन, ईएनटी शस्त्रक्रिया, पोटविकार शस्त्रक्रिया, स्त्रीरोग उपचार मोफत केले जाणार आहेत.

Advertisement
Tags :

.