महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

4 आरोपींना जामीन देण्यास नकार

06:45 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिल्ली कोचिंग इन्स्टीट्यूट दुर्घटना : 3 विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राजधानी दिल्लीच्या ओल्ड राजेंद्रनगर येथील राव कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांचा बुडून झालेल्या मृत्यूप्रकरणी संबंधित इमारतीच्या चार सहमालकांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. या कोचिंग सेंटरच्या तळघरात पावसाचे पाणी भरल्याने तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता.

विद्यार्थ्यांकडून मोठे शुल्क आकारूनही त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार झाल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राव कोचिंग सेंटरच्या दुष्काळजीपणामुळेच या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. इन्स्टीट्यूटने तळघरात अवैध स्वरुपात लायब्रेरी स्थापन केली होती. दुर्घटनेवेळी कोचिंग सेंटरमध्ये सुमारे 30 विद्यार्थी होते, ज्यातील 14 जणांना वाचविण्यास यश आले होते. तर उर्वरित काही जण स्वत:च तेथून बाहेर पडू शकले होते. तर उत्तरप्रदेशच्या आंबेडकरनगर येथील श्रेया यादव, तेलंगणाची तान्या सोनी आणि केरळचा निविन दलविन यांना या दुर्घटनेत जीव गमवावा लागला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article