जागतिक आव्हाने पेलण्यासाठी ‘युएन’मध्ये सुधारणा आवश्यक
युक्रेनला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली अपेक्षा : पोलंडसमवेत सकारात्मक चर्चा
वृत्तसंस्था/वॉर्सा
विदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुऊवारी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रातील सुधारणांवर भर दिला. जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि त्यांना तोंड देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. दोन दिवसांच्या दौऱ्यावर पंतप्रधान बुधवारी सायंकाळी पोलंडला पोहोचले. गुऊवारी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी सद्यस्थितीत भारत आणि पोलंड योग्य समन्वयाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे जात आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.
युद्धभूमीवर कोणतीही समस्या सोडवली जाऊ शकत नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. कोणत्याही संकटात निष्पाप लोकांचा मृत्यू होणे हे संपूर्ण मानवतेसाठी मोठे आव्हान बनले आहे. शांतता आणि स्थैर्य पुनर्संचयित करण्यासाठी भारत संवाद आणि मुत्सद्देगिरीला पाठिंबा देतो, असे पंतप्रधान म्हणाले. यासाठी आपल्या मित्र देशांसोबत सर्वतोपरी मदत देण्यास तयार आहे, असे महत्त्वाचे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनला रवाना होण्यापूर्वी केले आहे. पंतप्रधान मोदी दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी पोलंडला पोहोचले. पोलंडचा दौरा संपवून ते रेल्वेने युव्रेनला रवाना होणार आहेत. अडीच वर्षांनंतरही रशिया आणि युव्रेनमधील युद्ध थांबलेले नाही. व्रुस्क भागात युव्रेनियन सैन्याच्या प्रवेशाने युद्ध एका नवीन टप्प्यावर पोहोचले आहे. याचदरम्यान पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा होत आहे.
पोलंडसोबतच्या संबंधांमध्ये सुधारणा
दोन दिवसीय दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींनी पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. पोलंडच्या पंतप्रधानांच्या संबोधनावर प्रतिक्रिया देताना मोदी यांनी वॉर्सा या सुंदर शहरात पंतप्रधान टस्क यांच्याशी झालेल्या चर्चेअंती आणि त्यांनी केलेल्या स्वागताने आपण भारावल्याचे स्पष्ट केले. भारत-पोलंड मैत्री दृढ करण्यासाठी तुमचे अमूल्य प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आहेत. पोलंड भारताचा दीर्घकाळ चांगला मित्र आहे. भारत आणि पोलंड यांच्यातील मैत्री मजबूत करण्यासाठी टस्क यांनी खूप मोठे योगदान दिले आहे, असेही ते पुढे म्हणाले
पोलंडने दाखवलेल्या औदार्याबद्दल आभार
आज 45 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान पोलंडला पोहोचले आहेत. हे सौभाग्य मला माझ्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुऊवातीलाच मिळाले आहे. याप्रसंगी, मी पोलंडचे सरकार आणि लोकांचे विशेष आभार व्यक्त करतो. 2022 मध्ये युव्रेनच्या संकटात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात तुम्ही दाखवलेले औदार्य आम्ही भारतीय कधीही विसरू शकत नाही, असे मोदी म्हणाले.
भारत आणि पोलंडमधील संबंधांमध्ये आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. यावषी आम्ही आमच्या राजनैतिक संबंधांचा 70 वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. यानिमित्ताने आम्ही या नात्याचे धोरणात्मक भागिदारीत ऊपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि पोलंडमधील संबंध लोकशाही आणि कायद्याचे राज्य यासारख्या सामायिक मूल्यांवर आधारित आहेत. भारत आणि पोलंड आंतरराष्ट्रीय स्तरावरही घनिष्ठ समन्वयाने पुढे जात आहेत. जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी संयुक्त राष्ट्रे आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा करणे ही काळाची गरज असून त्यावर आम्ही दोघेही सहमत आहोत, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
आजचा दिवस दोन्ही देशांसाठी स्मरणीय : टस्क
आजचा दिवस आपल्या दोन्ही देशांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपल्या देशांमधील सामरिक संबंधांच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त भारताच्या पंतप्रधानांचे यजमानपद भूषवणे हा आपल्यासाठी मोठा सन्मान आहे. हा प्रवास अत्यंत महत्त्वाचा असल्याचा हा पुरावा आहे. आपल्या दोन्ही देशांमधील संबंध सुधारत असल्याचा हा नि:संशय पुरावा आहे. संपूर्ण प्रदेशासाठी हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन वॉर्सा येथे संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी केले.
मध्य आशिया आणि युव्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष आपल्या सर्वांसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. युद्धभूमीवर कोणतीही समस्या सुटू शकत नाही, असा भारताचा विश्वास आहे. कोणत्याही संकटात निष्पाप लोकांचा मृत्यू होणे हे संपूर्ण मानवतेसाठी आव्हान असते.
- नरेंद्र मोदी, भारतीय पंतप्रधान