महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुळगा (हिं.) येथे आढळलेल्या मनोरुग्णाची जिल्हा रुग्णालयात रवानगी

10:41 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उचगाव : सुळगा (हिं.) येथे आढळलेल्या आणि कुटुंबीयांशी झालेल्या वादातून रागाने घराबाहेर पडलेल्या  मनोरुग्ण युवकाची जिल्हा रुग्णालयात रवानगी करण्यात आली. रामशिष राकेश यादव (वय अंदाजे 18 रा. गोरखपूर, उत्तरप्रदेश) असे त्या युवकाचे नाव आहे. रामशिष यादव हा मूळचा उत्तरप्रदेश येथील असून वडिलांशी वाद झाल्यानंतर रागाने घराबाहेर पडला. यावेळी मानसिक संतुलन बिघडल्याने कोणताही विचार न करता मिळेल त्या रेल्वेने प्रवास करत बेळगावला पोहोचला. शनिवार दि. 2 डिसेंबर रोजी रात्री भरकटल्याने तो सुळगा (हिं.) वेंगुर्ला मार्गावर वास्तव्यास होता. रविवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी चौकशी केली असता, त्याने शिवीगाळ करत दगड उचलून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान ग्रा. पं. सदस्य महादेव कंग्राळकर व फकिरा कदम यांनी या घटनेची माहिती सुळगा येथील ग्रा. पं. सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते शट्टूप्पा पाटील यांना दिली. त्यांनी हायवे पेट्रोलिंग (महामार्ग गस्तीवरील) पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडयेकर यांच्याशी संपर्क साधला. आणि त्या युवकाची चौकशी करून त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडयेकर यांनी रुग्णवाहिकेला घटनास्थळी पाचारण केले. त्यानंतर  रुग्णवाहिकेतून त्या युवकाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी कुटुंबीयांशी केलेल्या चर्चेनंतर रामशिषचा भाऊ त्याला गावी परत नेण्यासाठी रवाना होणार आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article