For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘रेडमी 15सी’ भारतीय बाजारात सादर

06:06 AM Dec 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘रेडमी 15सी’ भारतीय बाजारात सादर
Advertisement

किंमत 12,499 रुपयांपासून सुरु : 50 मेगापिक्सलचा कॅमेरा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

टेक कंपनी रेडमीने भारतात एक नवीन बजेट स्मार्टफोन रेडमी 15 सी सादर केला आहे. परवडणारा 5 जी फोन शक्तिशाली 6000 एमएएच बॅटरी, 50 एमपी  कॅमेरा आणि 8 जीबी रॅमसह एआय वैशिष्ट्यांसह लाँच केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 3 प्रकारांमध्ये सादर केला आहे. त्याची किंमत 12,499 रुपयांपासून सुरू होते. फोनचा सेल 11 डिसेंबरपासून सुरू होईल. हा फोन डस्ट पर्पल, मूनलाईट ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध केला आहे.

Advertisement

रेडमी 15 सी पॉली कार्बोनेट मटेरियलपासून बनलेला आहे, परंतु फिनिश प्लास्टिकसारखा वाटत नाही. स्मार्टफोनचे वजन 212 ग्रॅम आहे, जे थोडे जड वाटू शकते. बाजूला असलेल्या पॉवर बटणात फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

डिस्प्ले: स्मार्टफोनमध्ये 6.9 इंचाची क्रीन आहे ज्याचे रिझोल्यूशन 720 x 1600 पिक्सेल आहे, एचडीप्लस रिझोल्यूशनसह वॉटरड्रॉप नॉच एलसीडी डिस्प्ले आहे.

कॅमेरा: फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनलवर ड्युअल रियर सेटअप देण्यात आला आहे. यात एलईडी फ्लॅशसह 50-मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर आहे, जो दुय्यम एआय लेन्ससह काम करतो.

Advertisement
Tags :

.