रेडमी 15 स्मार्टफोन बाजारात दाखल
7000 एमएएच बॅटरीसह 50 एमपी कॅमेराही मिळणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली
टेक कंपनी शाओमीचा सब ब्रँड रेडमीने भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन 15 सादर केला आहे. यामध्ये 144 एचझेड हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले 7000 एमएएच बॅटरी आणि स्नॅपडॅगन 6 एस आवृत्तीसह 3 चिपसेट आदी फिचर्स मिळणार आहेत.
सदरच्या नव्या फोनला 6 जीबी रॅम पर्याय मिळणार आहे. या फोनची सुरुवातीची किंमत ही 14,999 रुपये आहे. या फोनची स्पर्धा शाओमी, वीवो आणि रियलमी यासारख्या कंपन्यांसोबत राहणार आहे. स्मार्टफोनमध्ये एअरोस्पेस ग्रेड मेटल फिनिश राहणार आहे.
?फोनमध्ये आयपी64 डस्ट आणि स्प्लॅश रेजिस्टेंस आहे.
?फोनचे वजन 217 ग्रॅम आणि जाडी 8.4 मिमी आहे.
?ट्रिपल कॅमेरासेटअप, एलईडी फ्लॅश
?रेडमी 15 तीन कलरमध्ये उपलब्ध
?फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर
?7000 एमएएच क्षमतेची बॅटरी
? एआय सुविधांसह सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगची सेवा