कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गडहिंग्लजचा रेडा युवराज ठरला चॅम्पियन ऑफ द शो

01:41 PM Dec 31, 2024 IST | Radhika Patil
Reda Yuvraj of Gadhinglaj became the Champion of the Show
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

येथील तपोवन मैदानमध्ये सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनात हसुरचंपू (ता. गडहिंग्लज) येथील स्वप्निल अशोक पवार यांचा युवराज म्रुहा जातीचा रेडा हा चॅम्पियन ऑफ द शो ठरला आहे. प्रदर्शनास चार दिवसात 8 लाख शेतकरी, नागरिक यांसह ग्राहकांनी भेट दिली. या प्रदर्शनात तांदळासह अन्य धान्याची उच्चांकी विक्री होत एकूण 9 कोटींची उलाढाल झाली. तपोवन मैदान येथे सुरू असणाऱ्या सतेज कृषी प्रदर्शनाचा समारोप झाला.

Advertisement

दरवर्षी या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतो. शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी शेतीसाठी लागणारे साहित्य आणि माहिती मिळावी या उद्देशानेच आमदार सतेज पाटील यांनी या कृषी प्रदर्शनास सुरुवात केली. हे सहावे प्रदर्शन होते. शेवटच्या दिवशी सोमवारी तपोवन मैदानावर गर्दीचा जनसागर लोटला होता. चार दिवसात तांदळाची उच्चांकी विक्री झाली. 60 लाखांपेक्षा अधिक उलाढाल ही तांदळामधून झाली. महिला बचतगटांच्या खाद्यपदार्थ स्टॉलच्या माध्यमातून 50 लाखांची उलाढाल झाली. शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रे व अवजारे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली.

मसाले, जाम, उडीद नाचणी, हळद, विविध प्रकारचा तांदूळ, शेतीविषयक साहित्य बी बियाणे यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. समारोप प्रसंगी प्रकल्प संचालक जालिंदर पांगीरे, आत्माप्रमुख रक्षा शिंदे पशुधन विकास अधिकारी जिल्हा परिषद प्रमोद बाबर, गोकुळ संचालक बाबासो चौगुले, सामाजिक कार्यकर्ते धीरज पाटील, शेतकरी नेतृत्व बाबासाहेब देवकर, कृषी विकास केंद्र समन्वयक जयवंत जगताप, बाजार समितीचे सुयोग वाडकर, डॉ. सुनील काटकर, बिद्री कारखाना संचालक आर. एस. कांबळे, कृषी प्रदर्शन संयोजक विनोद पाटील, सहयोगी संशोधन संचालक (एनएआरपी) डॉ. अशोक पिसाळ आदींच्या उपस्थितीत विजेत्यांचा प्रशस्तीपत्र व ट्रॉफी व रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

संशोधनपर उपयुक्त शेती साहित्य निर्माण करणाऱ्या रिलायन्स पॉलिमर्स, महालक्ष्मी शेती विकास केंद्र, डी. वाय. पाटील ग्रुप, संजय घोडावत ग्रुप यांचे प्रायोजकत्व प्रदर्शनाला लाभले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, जिल्हा परिषद, पणन विभाग यांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बि-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खत व्यापारी, कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्निल सावंत आदींसह टिमचा व डॉ. सुनील काटकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समारोपप्रसंगी प्रास्ताविक व सूत्रसंचालन सतीश बर्गे यांनी केले.

चार दिवसात विक्री झालेला शेतमाल :

1) सेंद्रीय गूळ : 3800 किलो

2) इंद्रायणी तांदूळ : 6400 किलो

3) आजरा घनसाळ 13000 किलो

4) सेंद्रीय हळद : 1600 किलो

6) नाचणी : 1650 किलो

7) विविध बी. बियाणे 800 च्या आसपास

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article