कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लाल किल्ला स्फोटाचे तुर्किये कनेक्शन

06:33 AM Nov 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दहशतवादी डॉक्टरांच्या पासपोर्टमधून मिळाला सुगावा

Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तुर्कियेने कशाप्रकारे भारतासोबत शत्रुत्व पत्करले हे जगाने पाहिले आहे. आता दिल्लीत लाल किल्ल्यानजीक झालेल्या स्फोटांचे कनेक्शन तुर्कियेशी असल्याचे समोर येत आहे. स्फोटाचा मुख्य संशयित डॉ. मोहम्मद उमर उर्फ उमर उन नबी आणि फरीदाबाद मॉड्यूलशी निगडित आणखी एक संशयित डॉ. मुजम्मिल शकीलच्या पासपोर्टमधून त्यांच्या तुर्कियेच्या प्रवासाचे संकेत मिळाले आहेत. तुर्कियेमधूनच या दहशतवाद्यांना हल्लाचा आदेश मिळत होता असेही आढळून आले आहे.

दिल्ली स्फोटाप्रकरणी तपास करणाऱ्या यंत्रणा आता डॉ. उमर आणि डॉ. मुजम्मिलच्या तुर्किये लिंकचा शोध घेत आहेत. उमर नबी आणि मुजम्मिल शकीलने काही संशयास्पद टेलिग्राम ग्रूप जॉइन केल्यावर त्वरितच तुर्कियेसाठी प्रवास केला होता. त्यांच्या पासपोर्टच्या पडताळणीतून ही माहिती मिळाली आहे. तुर्किये आणि  अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतातील हँडलर सातत्याने संशयित सुसाइड बॉम्बर डॉ. उमर आणि फरीदाबाद मॉड्यूलच्या अन्य सदस्यांसोबत संपर्कात होते असे प्रारंभिक तपासातून समोर आले आहे.

मौलवी इरफानचा सहभाग

तुर्कियेतील हँडलरने फरीदाबाद टेरर मॉड्यूलशी जोडलेल्या डॉक्टरांना पूर्ण भारतात स्वत:चे लोकेशन टार्गेट करत फैलावून जाण्याचा निर्देश दिला होता. या लोकेशनमध्ये दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील फरीदाबाद आणि उत्तरप्रदेशातील सहारनपूरही सामील आहे. याचमुळे उमर आणि मुजम्मिलने स्वत:च्या तुर्किये दौऱ्यानंतर या ठिकाणांना लक्ष्य केले होते. श्रीनगरमध्ये अटक करण्यात आलेला मौलवी इरफान अहमदला फरीदाबाद मॉड्यूलचा सूत्रधार ठरविण्यात येत असून तो अफगाणिस्तानातील हँडलरच्या संपर्कात राहिला आहे.

मॉड्यूलमध्ये डॉक्टरांचा भरणा

संशयित सुसाइड बॉम्बर उमर हा फरीदाबाद मॉड्यूलचा सर्वात कट्टरवादी सदस्य होता. आतापर्यंत या मॉड्यूलशी संबंधित मुजम्मिल अहमद गनी, अदील मजीर राथर, सज्जाद मलिक, शाहीन सईद यांना अटक करण्यात आली आहे. फरीदाबादच्या अल-फलाह मेडिकल कॉलेजमध्ये हे दहशतवादी एकत्र जमत होते.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article