कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑपरेशन सिंदूरनंतर उत्तरप्रदेशात रेड अलर्ट

06:24 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुरक्षा व्यवस्था वाढविली : पोलीस महासंचालकांनी दिली माहिती

Advertisement

► वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेष स्वरुपात उत्तरप्रदेशात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. राज्याची कायदा-सुव्यवस्था मजबुत राखण्यासाठी प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संरक्षण दलांसोबत समन्वय स्थापन करत राज्याच्या महत्त्वपूर्ण संस्थांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचा निर्देश राज्य पोलिसांना देण्यात आले आहेत. रेल्वेस्थानक, बसस्थानक, विमानतळे, बाजारपेठ आणि अन्य गर्दीयुक्त ठिकाणांवरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

उत्तरप्रदेश पोलीस सतर्क असून आमच्या पुरेशी साधनसामग्री आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. सर्व विभागांना विशेष सतर्कता बाळगणे आणि कुठल्याही आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उत्तरप्रदेशच्या सीमांवरील देखरेख वाढविण्यात आल्याची माहिती पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली आहे.

राज्यात वाढविली सतर्कता

राज्यात ड्रोन कॅमेरे, स्पेशल कमांडो पथक आणि दहशतवादविरोधी पथकाला हायअलर्टवर ठेवण्यात आले आहे. गुप्तचर यंत्रणांना संवेदनशील ठिकाणांवर नजर ठेवण्याचे निर्देश मिळाले आहेत. अफवांवर लक्ष देऊ नका आणि कुठल्याही संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित पोलिसांना देण्याचे आवाहन प्रशांत कुमार यांनी सर्वसामान्य नागरिकांना केले आहे.

सुरक्षादल तैनात

राज्यात रेल्वेस्थानक, बसस्थानक, मेट्रोस्थानक, धार्मिकस्थळे, शॉपिंग मॉल्स आणि अन्य गर्दीयुक्त भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. सर्व संवेदनशील भागांमध्ये सातत्याने गस्त घातली जात आहे. तसेच गुप्तचर यंत्रणांसोबत मिळून संभाव्य धोका ओळखण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article