महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्लीसह 5 राज्यात धुक्याचा रेड अलर्ट

06:39 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

271 उड्डाणांना विलंब : काही भागात पाऊस-हिमवर्षावाचाही इशारा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशाच्या बहुतांश भागात सध्या थंडी वाढत असली तरी उत्तर भारतातील जनता दाट धुक्यामुळे हैराण झाली आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पडणाऱ्या दाट धुक्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथील धुके इतके दाट आहे की अनेक भागात दृश्यमानता शून्य झाली आहे. रेल्वे आणि विमान उड्डाणांवर त्याचा थेट परिणाम झाला आहे. तसेच रस्त्यांवरही वाहनांची ये-जा कमी झाली आहे.

पुढील दोन दिवस देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये दाट धुके पडण्याची शक्मयता आहे.  शुक्रवार, 29 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दृश्यमानता शून्य होती. दाट धुक्यामुळे तब्बल 271 विमानोड्डाणांना उशीर झाला.  एकीकडे धुके पडत असतानाच 30 आणि 31 डिसेंबर रोजी उत्तर भारतातील अनेक भागात पाऊस पडण्याचीही शक्मयता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पर्वतमय भागात बर्फवृष्टी देखील अपेक्षित आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये तापमानाचा पारा सातत्याने घसरत आहे. दाट धुके आणि थंडीमुळे नोएडामधील बारावीपर्यंतच्या शाळा 30 डिसेंबरपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. मेरठ आणि गाझियाबादमध्ये नर्सरी ते आठवीपर्यंतचे वर्गही बंद आहेत. दिल्ली आणि नोएडामध्ये किमान तापमान 11 अंश आणि कमाल तापमान 21 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. याचदरम्यान नोएडासाठी ‘कोल्ड डे अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये शुक्रवारी पहाटे 5.30 च्या सुमारास दाट धुके होते. जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानात खूप दाट धुके दिसले. दिल्ली, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश, झारखंडमध्ये मध्यम ते दाट धुके दिसून आले. ओडिशा आणि बिहारच्या विविध भागातही धुक्याचे प्रमाण जास्त होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article