महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कर्मचारी आयोगातर्फे भरती सुरू

10:02 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विविध खात्यात 33 पदांसाठी मागविले अर्ज

Advertisement

पणजी : राज्य सरकारने स्थापन केलेल्या गोवा कर्मचारी भरती आयोगातर्फे (जीएसएससी) आता प्रत्यक्षात नोकरभरती प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली असून क-गटातील पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्याद्वारे विविध खात्यांसाठी 33 कर्मचाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या पदांसाठी दि. 22 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. आतापर्यंत राज्य सरकारात प्रत्येक खात्यातर्फे स्वतंत्ररित्या जाहिरात देऊन थेट कर्मचारी भरती होत होती. हल्लीच्या काही वर्षात अशा भरती प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप, अधिकाऱ्यांची लुडबूड, लाचखोरी, दलाली व त्यातून फसवेगिरी यासारख्या असंख्य गैरकारभारांना ऊत आला होता. त्यामुळे एका अर्थाने पात्र उमेदवारांवर अन्यायच होऊन वशिल्याचे तट्टू वा लाखोंची लाच देण्यास सक्षम उमेदवारांनाच नोकऱ्या मिळत होत्या.

Advertisement

गैरप्रकार रोखण्यासाठी भरती

हे प्रकार रोखण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी धाडसी पाऊल उचलताना  गोवा लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर ’गोवा कर्मचारी भरती आयोग’ स्थापन करण्याची घोषणा केली होती. क-गट श्रेणीतील कर्मचाऱ्यांचीही लोकसेवा आयोगाच्याच पद्धतीने निवड करणे हा त्यामागील उद्देश होता. भविष्यात कोणत्याही खात्याला कर्मचारी भरती करायची असल्यास या आयोगास कळवावे लागेल. त्यानंतर जीपीएससीच्याच धर्तीवर मुलाखत प्रक्रिया होऊन पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यातील बहुतेक पदांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा 45 वर्षे ठेवण्यात आली असून विद्यमान सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्षे शिथील करण्यात येईल, असे जाहिरातीत म्हटले आहे. यातील काही पदे बिगर राखीव आहेत तर उर्वरित अनुसूचित जाती, जमाती, अन्य मागासवर्ग, विशेष क्षमतेचे उमेदवार, ईडब्ल्यूएस यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

पहिल्या भरतीत 9 वर्गातील 33 पदांचा समावेश

या आयोगातर्फे पहिली जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्याद्वारे 9 वर्गवारीतील 33 पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने नेटवर्क अभियंता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (फॉरेन्सिक प्रयोगशाळा-वेर्णा), साहाय्यक उपनिरीक्षक (वायरलेस ऑपरेटर), इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञ, ग्रंथपाल ग्रेड-1, ग्रंथपाल ग्रेड-2, चित्रकला शिक्षक, संरक्षक साहाय्यक, लाईट हाऊस किपर, आदी पदांचा समावेश आहे. त्याद्वारे निवडण्यात आलेले कर्मचारी वाहतूक, पोलीस, शिक्षण, उच्च शिक्षण, संग्रहालय, बंदर कप्तान आदी खात्यांसाठी काम करणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article