कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ग्रंथपालांची 44 जागांवर लवकरच नियुक्ती

11:07 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जिल्हा पंचायतमध्ये आढावा बैठक

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यातील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ग्राम पंचायतींच्या व्याप्तीमध्ये ग्रंथालय उभारण्यात आली आहेत. विविध कारणांनी रिक्त झालेल्या ग्रंथपालांच्या जागा भरून घेण्यासाठी जिल्हा पंचायतमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हा पंचायत अधिकारी बसवराज हेग्गनाईक यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील विविध ग्राम पंचायतींच्या व्याप्तीत येणाऱ्या ग्रंथालयांमध्ये 44 जागा रिक्त आहेत. या जागांवर लवकरच ग्रंथपालांची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील अधिकाऱ्यांची बैठक जिल्हा पंचायत कार्यामध्ये बोलाविण्यात आली होती. यावेळी बसवराज हेग्गनाईक यांनी रिक्त असलेल्या ग्रंथपालांच्या जागांची आणि जिल्ह्यामध्ये नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ग्राम पंचायतींची माहिती घेतली. त्या ठिकाणी असणारी ग्रंथालयांची आवश्यकता, जागा, इमारत आदींच्या माहितीबरोबरच जिल्ह्यात निर्माण करण्यात आलेल्या डिजीटल ग्रंथालयांची माहितीही त्यांनी घेतली. ग्रंथालयांमध्ये पुस्तकांची आवश्यकता याचबरोबर पुस्तकांची होणारी देवाण-घेवाण, पुस्तकांचे संरक्षण आदी विषयांची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतली. ग्रंथालयांमध्ये रिक्त असलेल्या 44 जागांसाठी लवकरच नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी रोस्टर पद्धत अवलंबावी लागणार आहे. त्यानुसार रिक्त जागांवर नेमणूक केली जाणार आहे. त्यामुळे सरकारच्या मार्गसूचीनुसारच नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या तयार करण्यात आलेली यादी तात्पुरती असून आणखी एकदा बैठक घेऊन यादी निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

मार्गसूचीनुसार...

जिल्ह्यात विविध कारणांनी रिक्त झालेल्या व नवीन ग्राम पंचायतींच्या व्याप्तीमधील ग्रंथालयांमध्ये एकूण 44 जागा रिक्त आहेत. सरकारच्या मार्गसूचीनुसार सदर जागा भरून घेतल्या जाणार आहेत.

- बसवराज हेग्गनाईक, जि. पं. साहाय्यक अधिकारी

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article