1 लाख इनोव्हा हायक्रॉस विक्रीचा विक्रम
वृत्तसंस्था/ बेंगळूर
टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने भारतात इनोव्हा हायक्रॉसच्या 1,00,000 होलसेल युनिट्स विक्रीचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. लाँचच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त, हा टप्पा ग्राहकांचा टोयोटा ब्रँडवर असलेला विश्वास आणखी मजबूत करतो, तसेच इनोव्हा हायक्रॉसची वाढती लोकप्रियता दर्शवतो, जी तिच्या प्रगत तंत्रज्ञान, अतुलनीय आराम, आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी प्रचलित आहे.
नोव्हेंबर 2022 मध्ये लाँच करण्यात आलेली, इनोव्हा हायक्रॉस, टिकाऊ गतिशीलतेसाठी मल्टी-पॅथवे स्वीकारून टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या वचनबद्धतेच्या दिशेने एक आणखी पाऊल आहे. ही इनोव्हा हायक्रॉस टोयोटाच्या जागतिक स्तरावर प्रसिद्ध गुणवत्तेचे, टिकाऊपणाचे आणि विश्वासार्हतेचे अद्वितीय मिश्रण असून, ती अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण डिझाईनसह सुसंगतपणे तयार करण्यात आली आहे.
टोयोटाच्या अॅडव्हान्स ग्लोबल आर्किटेक्चर (टीएनजीए) वर आधारित, इनोव्हा हायक्रॉस ही 5व्या पिढीतील सेल्फ-चार्जिंग स्ट्रॉंग हायब्रिड इलेक्ट्रिक सिस्टीमद्वारे चालवली जाते. यात 2.0-लिटर 4-सिलिंडर गॅसोलिन इंजिन आणि ई-ड्राईव्ह सिक्वेन्शियल शिफ्ट आहे, जो 137क्sं (186 पीएस) ची इम्प्रेसिव्ह पॉवर आउटपुट देतो आणि सेगमेंटमधील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमतेची ऑफर देतो. हायब्रिड सिस्टीम वाहनाला 60 टक्के वेळेत इलेक्ट्रिक (ईव्ही) मोडमध्ये चालविण्यास सक्षम करते, जे पॉवर, कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरकतेचे सुरेख संयोजन प्रदान करते. याशिवाय, या मॉडेलमध्ये निवडक व्हेरियंट्समध्ये 2.0-लिटर गॅसोलीन इंजिनसह डायरेक्ट शिफ्ट सीव्हीटीचापर्याय देखील आहे.