होंडाची नवी सुधारीत अमेझ अनेक वैशिष्ठ्यांसह सादर
नवी दिल्ली :
होंडा कंपनीने आपली नवी सुधारीत आवृत्ती ‘अमेझ’ बुधवारी भारतीय बाजारात उतरवली आहे. नव्या पिढीला पसंत पडणारी सेदान प्रकारातील ही कार अनेक वैशिष्ट्यांनी युक्त आहे. या कारची किंमत 8 लाखाच्या घरात असणार आहे.
हनीकोंब फ्रंट ग्रील सोबत एलईडी टेल लॅम्प्स याला देण्यात आले आहेत. फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट सिस्टीम, थ्री स्पोक स्टिअरिंग व्हील आणि सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यात दिले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी म्हणून 6 एअर बॅग सोबत रियर पार्किंग कॅमेरा असणार आहे. ताज्या नव्या सुधारीत रचनेसह एडीएएस (होंडा अॅडव्हान्सड ड्राइव्हर असिस्टंट सिस्टीम्स)यासारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह गाडी सादर केली असून व्ही, व्हीएक्स व झेडएक्स या तीन प्रकारांसह 6 रंगांमध्ये ती उपलब्ध करण्यात आलीय. वरील किंमत सवलतीतील असून 45 दिवसांपर्यंत लागू असणार आहे. स्लीक एलईडी प्रोजेक्टर हेडलाइटस, नव्याने रचीत फॉग लाइटस्, 15 इंचाचे अलॉय व्हील्स व पुर्नरचित बंपर व टेल लाइटस् अशी काही इतर वैशिष्ठ्यो या गाडीत पाहायला मिळतील.
इतर वैशिष्ट्यो....
? 8 इंचाची फ्लोटींग टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम
? क्लायमेट कंट्रोल पॅनेल
? 416 लिटरची बुट स्पेस
? वायरलेस चार्जिंग पॅड
? पॅडल शिफ्टसं, कीलेस एंट्री
? 6 एअरबॅग्ज
? 1.2 लिटर पेट्रोल इंजिन
? 5 स्पीड मॅन्युअल किंवा सीव्हीटी गिअरबॉक्स