महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

टी-20 वर्ल्ड कपसाठी विक्रमी बक्षीस रक्कम

06:43 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

विंडीज व अमेरिका येथे सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने भरघोस बक्षीस देण्याची घोषणा केली असून 11.25 दशलक्ष डॉलर्स (93.5 कोटी रु.) अशी विक्रमी बक्षीस रक्कम ठेवली आहे.

Advertisement

‘टी-20 विश्वचषक विजेत्याला 2.45 दशलक्ष डॉलर्स (20.36 कोटी रु.) दिले जाणार असून या स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे,’ असे आयसीसीने म्हटले आहे. या स्पर्धेच्या नवव्या आवृत्तीत एकूण 20 संघांनी भाग घेतला असून विंडीज व अमेरिकेतील 9 केंद्रांवर यातील सामने खेळविले जात आहेत. त्यामुळे ही सर्वात मोठी स्पर्धा मानली जात आहे. उपविजेत्या संघाला 1.28 दशलक्ष डॉलर्स (10.64 कोटी रु.), उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी 787,500 डॉलर्स (6.54 कोटी रु.) मिळतील. दुसरी फेरी पार करण्यात अपयशी ठरलेल्या संघांना प्रत्येकी 382,500 डॉलर्स (3.17 कोटी रु.), 9 ते 12 वे स्थान मिळविणाऱ्या संघांना प्रत्येकी 247,500 डॉलर्स (2 कोटी रु.) आणि 13 ते 20 व्या स्थानावरील संघांना प्रत्येकी 225,000 डॉलर्स (1.87 कोटी रु.) बक्षीस दिले जाईल. याशिवाय उपांत्य व अंतिम फेरी वगळता सामना जिंकणाऱ्या प्रत्येक संघाला 31,154 डॉलर्स (26 लाख रु.) दिले जातील. अनेक अर्थाने ही स्पर्धा ऐतिहासिक ठरली असल्याने त्याचे प्रतिबिंब खेळाडूंना मिळणाऱ्या बक्षीस रकमेतही दिसणे आवश्यक आहे. या स्पर्धेचा जगभरातील करोडो शौकीन घेत असल्याचे आयसीसीचे प्रमुख कार्यकारी जेफ अॅलरडाईस यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article