For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डाळिंबाला उच्चांकी दर : शेतकऱ्यांचा जल्लोष

01:42 PM Aug 11, 2025 IST | Radhika Patil
डाळिंबाला उच्चांकी दर   शेतकऱ्यांचा जल्लोष
Advertisement

आटपाडी :

Advertisement

आटपाडी बाजार समितीतील डाळिंब सौदे बाजारात डाळिंबाला उच्चांकी दर मिळाला. मंगलमूर्ती फ्रुट सप्लायर्सच्या अडतीमध्ये डाळिंबाला प्रतिकिलो ३११, २५१, २११, २०० रुपये दर मिळाला. यानंतर शेतकऱ्यांनी फटाके वाजवून आंदोत्सव साजरा केला.

आटपाडी बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात नेहमीच चांगल्या दराचे विक्रम प्रस्थापित झाले आहेत. सध्या श्रावण महिना चालू असल्याने दरात चांगली वाढ झाल्याचे मंगलमूर्ती फ्रुट सप्लायार्सचे प्रमुख पंढरीनाथ नागणे यांनी स्पष्ट केले. सध्या ४ ते ५ हजार क्रेट डाळिंबाची आवक अडतीवर होत आहे. आटपाडीसह सांगोला, अकलूज, नातेपुते, माळशिरस, दौंड, इंदापूर, अहिल्यानगर, अक्कलकोट, कर्नाटकातील विजापूर व बेळगाव परिसरातून आवक होत आहे.

Advertisement

बाजारपेठेत दर्जेदार डाळिंबाला मागणी वाढत आहे. त्यामुळे दरामध्ये वाढ होताना दिसून येते. डाळिंबाबरोबर ड्रॅगन, पेरू, चिकू, सिताफळ याचीही दैनंदिन आवकही आटपाडी मध्ये होत आहे. रविवारी सौदे बाजारात रवींद्र गायकवाड (गुरसाळे) यांच्या उच्चप्रतीच्या डाळिंबाला विक्रमी ३११ रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला.

पिलीव येथील शेतकरी रामचंद्र भैस यांच्या मालाला उच्चप्रतीच्या डाळिंबाला २५१ रुपये दर मिळाला. विठ्ठल फडतरे (भगतवाडी) यांच्या मालाला २११ रुपये प्रति किलो दर मिळाला. ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्या डाळिंबाला २०० रुपये दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यांनी जल्लोष केला.

देशभरात डाळिंब पोहचण्यासाठी बाहेरील मार्केटला भेटी देऊन तेथील व्यापारी वर्ग आटपाडीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. चांगल्या मालाबरोबर फुटलेल्या व खराब मालाची देखील खरेदी गरजेची असते. तो व्यापारी वर्ग आटपाडीमध्ये उपलब्ध करावा लागतो, त्यासाठी आम्ही मंगलमुर्ती फुट कंपनी मार्फत प्रयत्न करत असल्याची माहिती पंढरीनाथ नागणे दिली. सौदे बाजाराच्या यशस्वी वाटचालीसाठी आटपाडी बाजार समिती मोलाचे सहकार्य करत असल्याचे पंढरीनाथ नागणे यांनी रपष्ट केले. तर आटपाडी बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी शेतकऱ्यांना आपला डाळिंब माल आटपाडी बाजार समिती सौदे बाजारात आणून योग्य भाव मिळवावा, असे आवाहन केले.

Advertisement
Tags :

.