महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये विक्रमी गुंतवणूक

06:49 AM Nov 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बाजारात घसरण असतानाही मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीकडे कल : निव्वळ गुंतवणुकीत 22 टक्क्यांची वाढ  

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

शेअर बाजारात मोठी घसरण होऊनही ऑक्टोबर महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंड (एमएफ) योजनांमधील निव्वळ गुंतवणूक 22 टक्क्यांनी वाढून सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. ऑक्टोबरमध्ये या योजनांमध्ये 41,887 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक करण्यात आली आहे. जून 2024 च्या सुरुवातीला, इक्विटी म्यच्युअल फंडमध्ये सर्वाधिक मासिक 40,608 कोटी रुपयांचा प्रवाह होता.  तज्ञांनी सांगितले की, बाजारातील मंदीच्या काळात खरेदीची संधी पाहून गुंतवणूकदार वन-टाइम इक्विटी एमएफकडे झुकले आहे, ज्यामुळे या विभागात विक्रमी गुंतवणूक झाली आहे.

मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाचे सहयोगी संचालक (व्यवस्थापक संशोधन) हिमांशू श्रीवास्तव म्हणाले, ‘ऑक्टोबर महिन्यात बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इक्विटी एमएफ सेगमेंटने सलग 44व्या महिन्यात निव्वळ आवक नोंदवली.’

म्युच्युअल फंड इंडस्ट्री बॉडी अॅम्फीने जारी केलेला डेटा दर्शवितो की सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये या कालावधीत 25,323 कोटींची विक्रमी गुंतवणूक झाली तर न्यू फंड ऑफरमध्ये 4,047 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

कोटक म्युच्युअल फंडमधील विक्री, विपणन आणि डिजिटल व्यवसायाचे राष्ट्रीय प्रमुख मनीष मेहता म्हणाले, ‘क्षेत्रनिहाय श्रेणीतील एनएफओमुळे निव्वळ विक्रीचे आकडे मजबूत राहिले.

वितरक गुंतवणूकदारांना सतत सल्ला देत आहेत की बाजारातील उलथापालथ आणि मोठ्या घसरणीवर एकरकमी खरेदीच्या पार्श्वभूमीवर एसआयपी आणि सिस्टिमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन्स (एसटीपी) द्वारे बाजारात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. लार्ज आणि फ्लेक्सी कॅप फंडांमध्ये एकूण 8,633 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.

ऑक्टोबरमध्ये स्मॉलकॅप आणि मिडकॅप फंडांमध्ये 8,455 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करण्यात आली. अपेक्षेपेक्षा कमी कॉर्पोरेट तिमाही निकाल आणि यूएस निवडणुकांपूर्वी विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे ऑक्टोबरमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण झाली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article