सर्वाधिक काळ बेडवर राहण्याचा विक्रम
चीनमध्ये गादी तयार करणाऱ्या एका कंपनीने स्वत:च्या पॅम्पेनिंगसाठी एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला लाइव्ह स्ट्रीम करण्यात आले. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या लोकांना केवळ गादीवर पडून रहायचे होते. सर्वाधिक काळ गादीवर झोपून राहणाऱ्या उमेदवाराला विजयी ठरविण्यात आले. या स्पर्धेला सोशल मीडिया आणि अन्य प्लॅटफॉर्मवर कंपनीने स्वत:च्या प्रचारासाठी लाइव्ह स्ट्रीम केले. या स्पर्धेने लाखो प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या 23 वर्षीय इसमाला स्पर्धेचा विजयी घोषित करण्यात आले आहे.
हा इसम सलग 33 तास आणि 35 मिनिटांपर्यंत गादीवर पडून राहिला. एका चिनी गादी ब्रँडने ही स्पर्धा उत्तर चीनच्या इनर मंगोलिया येथील बाओटौच्या एका शॉपिंग सेंटरमध्ये आयोजित केली.
या स्पर्धेचे शीर्षक लोकप्रिय शब्द ‘पहडून रहा’शी मिळतेजुळते आहे. याला चिनी भाषेत तांग पिंग नावाने ओळखले जाते. कठिण मेहनतीला अस्वीकार करणारी तसेच किमान काम करण्यास प्राथमिकता देणारी ही मानसिकता आहे. जी मोठा सामाजिक दबाव आणि कठिण रोजगारबाजारामुळे युवांदरम्यान लोकप्रिय झाली आहे.
स्पर्धेचे नियम
स्पर्धेत जो व्यक्ती गादीवर आडवा राहिल किंवा शौचालयास न जाता दीर्घकाळ गादीवर पडून राहिल तोच विजयी ठरविण्याचा नियम होता. स्पर्धकांना केवळ कूस बदलणे, पुस्तक वाचणे आणि स्वत:च्या मोबाइल फोनचा वापर करण्याची अनुमती होती. त्यांना टेकअवे उत्पादनांची ऑर्डर करणे आणि पोटाच्या बळावर झोपून खाण्याचीही अनुमती होती. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या बहुतांश लोकांनी शौचालयाच्या समस्येपासून वाचण्यासाठी डायपर परिधान केले होते. जवळपास 240 लोकांनी यात भाग घेतला, ज्यातील 186 जणांनी एका दिवसात धूम्रपानासाठी या स्पर्धेतून काढता पाय घेतला.
केवळ 3 जण अखेरपर्यंत टिकले
33 तास आणि 9 मिनिटे झाल्यावरही केवळ तीन जण टिकून राहिले. आयोजकांनी काठिण्यपातळी वाढवत उर्वरित तीन लोकांना एकाचवेळी स्वत:चे पाय आणि हात वर उचलण्यास सांगितले, जो व्यक्ती दीर्घकाळापर्यंत असे करण्यास सक्षम राहिला, त्याला विजेता घोषित करण्यात आले. अखेरीस 23 वर्षांचा युवकच स्पर्धेत सर्वाधिक काळापर्यंत प्रत्येक काठिण्यपातळी आणि अटी पूर्ण करण्यास यशस्वी ठरला. माझ्या प्रेयसीने स्पर्धेची लिंक पाठविली होती आणि यात सहभागी होण्याची सूचना केली होती, असे त्याने सांगितले.
विजेत्याला इनाम
मी अधिक तयारी केली नव्हती. स्पर्धेदरम्यान हार मानावी असा विचार मनात आला होता, परंतु प्रेयसीने मला टिकून राहण्यास सांगितल्याचे विजेत्याने म्हटले आहे. पहिल्या तीन विजेत्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या इसमाला 140 डॉलर्स, दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या स्पर्धकाला 280 डॉलर्स आणि विजेत्याला 420 डॉलर्स म्हणजेच सुमार 37 हजार रुपये मिळाले आहेत. मी या रकमेतून स्वत:च्या मित्रांना हॉटपॉट डिनर खाऊ खालणार आहे. ते स्पर्धेदरम्यान मला भेटण्यासाठी आले होते आणि माझ्यासाठी खाद्यपदार्थ घेऊन आले होते, असे विजेत्याने सांगितले आहे.