सर्वाधिक काळ जागण्याचा विक्रम
एखादा इसम किती काळ झोपेशिवाय राहू शकतो या प्रश्नाचे उत्तर नेमकेपणाने देणे अवघड आहे. आजच्या काळात गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या प्रश्नाचे उत्तर आहे. अलिकडच्या काळापर्यंत हा कालावधी केवळ 11 दिवसांचा होता. परंतु एका युट्यूबरने हा विक्रम मोडीत काढला आहे. युट्यूबर नॉर्मेच्या व्हायरल स्ट्रीममध्ये 19 वर्षीय स्टारला जागताना दाखविण्यात आले असून पोलीस त्याच्यावर सातत्याने नजर ठेवून होते. 12 दिवसांच्या दीर्घ कालावधीदरम्यान नॉर्मच्या चाहत्यांनी त्याच्या आरोग्याच्या चिंतांमुळे अधिकाऱ्यांना त्याची भेट घेण्यासाठी बोलाविले होते.
नॉर्मने जेव्हा 264 तास आणि 24 मिनिटांसाठी विक्रम मोडीत काढल्यावर युट्यूबचे पर्यायी प्लॅटफॉर्म ‘रंबल’वर नॉर्मचे 9 हजार ह्युअर्स होते. 12 दिवसांच्या अखेरीस रुग्णवाहिका आणि पोलिसांची वाहने त्याच्या घराबाहेर उभी होती. न झोपता सर्वाधिक काळ जागे राहण्याचा मागील विक्रम रँडी गार्डनर या व्यक्तीच्या नावावर होतो. तो 1964 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी सलग 11 दिवसांपर्यत जागा राहिला होता. रँडीने स्वत:च्या प्रयत्नांदरम्यान मतिभ्रमाचा अनुभव घेतला होता. तर वैज्ञानिकांनी त्याच्या प्रत्येक कृतीला चित्रित केले होते.
रँडीने विक्रम करण्यापूर्वी दोन अन्य लोक 400 तासांहून अधिक काळ जागे राहिले होते. मॅकडोनाल्ड आणि मॉरीन वेस्टन यांच्या या कामगिरीला गिनिज बुक ऑफ रेकॉर्डने मान्यता दिली नव्हती. विक्रम नोंदविण्याच्या सर्व मागील प्रयत्नांमध्ये संबंधितांवर देखरेख ठेवण्यासाठी डॉक्टर्स उपलब्ध होते. परंतु नॉर्मसोबत असे नव्हते.
केवळ 24 तास झोपेशिवाय राहिल्यावर लोकांचा समन्वय, स्मृती आणि निर्णय घेण्याची क्षमता बिघडून जाते. हा कालावधी 36 तासांपर्यंत वाढविला तर शारीरिक आरोग्य बिघडू लागते. तज्ञांनुसार दोन दिवसांच्या झोपेपासून वंचित राहिल्या शरीर ‘ऑफलाइन’ होण्यास सुरुवात होते.