महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पंजाबचा रेकॉर्डब्रेक विजय

06:58 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयपीएलमध्येही सर्वोच्च धावसंख्या केली चेस : केकेआरवर 8 गडी राखून दणदणीत विजय

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाही, या गोष्टीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. ईडन गार्डन स्टेडियमवर केकेआरने 261 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर पंजाबला हे आव्हान पेलवणार नाही, असे वाटत होते. पण दोन सामन्यात बाहेर बसवल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या जॉनी बेअरस्टो 48 चेंडूत नाबाद 108 व शशांक सिंग 28 चेंडूत नाबाद 68 धावा या जोरावर पंजाबने विजयी आव्हान 18.4 षटकांत पूर्ण करत दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे, कोणत्याही टी 20 स्पर्धेत धावांचा पाठलाग करतानाची ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. याआधी, द.आफ्रिकेने विंडीजविरुद्ध 259 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. शुक्रवारी मात्र पंजाबने हा विक्रम स्वत:च्या नावे केला आहे.

केकेआरने दिलेल्या 262 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबकडून प्रभसिमरन आणि जॉनी बेअरस्टो यांनी वादळी सुरुवात केली. प्रभसिमरनने अवघ्या 20 चेंडूमध्ये 54 धावांची तुफानी खेळी साकारली. यामध्ये पाच षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. जॉनी बेयरस्टोने 48 चेंडूमध्ये नाबाद 108 धावांची आक्रमक खेळी केली. पाऊस पाडला. या खेळीत त्याने नऊ षटकार आणि आठ चौकार लगावले. पंजाबने पहिल्या विकेटसाठी 6 षटकांमध्ये 93 धावांचा पाऊस पाडला. प्रभसिमरन रन आऊट झाल्यानंतर रॉस्यू व बेअरस्टो यांच्यात 85 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान, रॉस्यूने 16 चेंडूत 26 धावा केल्या.

बेअरस्टो, शशांकचा जलवा

प्रभसिमरन व रॉस्यू बाद झाल्यानंतर बेअरस्टो व शशांक सिंग यांनी केकेआरच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. शशांक सिंगने पहिल्या चेंडूपासून एकामागोमाग एक षटकार लगावत धावगतीचं दडपण खाली आणलं. बेअरस्टोने 45 चेंडूत शतक साजरे केले. आयपीएलमधील बेअरस्टोचे हे दुसरे शतक आहे. शशांक सिंगने 28 चेंडूत 2 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 68 धावा करत पंजाबच्या स्वप्नवत विजयावर शिक्कामोर्तब केलं. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 37 चेंडूत 84 धावा कुटल्या.

केकेआरच्या पदरी निराशा

पंजाबचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरच्या सुनिल नरेन आणि फिल सॉल्ट जोडीने पहिल्या चेंडूपासूनच पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या जोडीने पॉवरप्लेमध्येच 76 धावा केल्या. नरेनने 23 चेंडूत तर सॉल्टने 25 चेंडूत अर्धशतक झळकावले. या जोडीने 10.2 षटकात 138 धावांची भागिदारी केली. यंदाच्या हंगामातील ही सर्वात मोठी सलामीची भागिदारी ठरली. नरेनने 32 चेंडूमध्ये 71 धावांचा पाऊस पाडला. आपल्या वादळी खेळीमध्ये चार षटकार तर नऊ चौकार ठोकले. नरेनला राहुल चहरने बाद करत ही जोडी फोडली. नरेन बाद झाल्यानंतर सॉल्टनेही 37 चेंडूत 6 चौकार व 6 षटकारासह 75 धावांची तुफानी खेळी साकारली.

सलामीची जोडी बाद झाल्यानंतर आंद्रे रसेलने 12 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने 10 चेंडूमध्ये 28 धावा केल्या. या खेळीमध्ये श्रेयस अय्यरने तीन षटकार आणि एक चौकार ठोकला. रिंकू सिंह चार चेंडूत पाच धावा काढून बाद झाला. रमणदीप तीन चेंडूत सहा धावा काढून नाबाद राहिला. वेंकटेश अय्यरनं शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली वेंकटेश अय्यरने 23 चेंडूमध्ये 39 धावांची खेळी केली. या दमदार खेळीच्या जोरावर केकेआरने 20 षटकांत 6 गडी गमावत 261 धावांचा डोंगर उभा केला.

संक्षिप्त धावफलक :

केकेआर 20 षटकांत 6 बाद 261 (फिल सॉल्ट 75, सुनील नरेन 71, वेंकेटश अय्यर 39, आंद्रे रसेल 24, श्रेयस अय्यर 28, रमणदीप सिंग नाबाद 6, अर्शदीप सिंग 2 तर सॅम करन, हर्षल पटेल व राहुल चहर प्रत्येकी एक बळी).

पंजाब 18.4 षटकांत 2 बाद 262 (प्रभसिमरन सिंग 20 चेंडूत 54, बेअरस्टो 48 चेंडूत नाबाद 18, रॉस्यू 26, शशांक सिंग 28 चेंडूत नाबाद 68, सुनील नरेन एक बळी).

टी 20 क्रिकेटमधील सर्वोत्तम यशस्वी पाठलाग

आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध 259 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. हा विक्रम शुक्रवारी मोडीत निघाला आहे. टी 20 क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग ठरला आहे. पंजाबने 262 धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. तिसऱ्या क्रमांकावर मिडिलेक्स संघाचा क्रमांक लागतो. त्यांनी सरे संघाविरोधात 253 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. तर या यादीत चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरोधात 244 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

40 षटकांत 523 धावांचा पाऊस, 37 चौकार व 42 षटकारांची आतषबाजी

शुक्रवारी ईडन गार्डन स्टेडियमवर कोलकाता आणि पंजाब सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पहायला मिळाला. 40 षटकांमध्ये 523 धावांची आतषबाजी पहायला मिळघ्ली. या सामन्यात तब्बल 42 षटकार तर 37 चौकार लगावले गेले. विशेष म्हणजे, आयपीएलच्या इतिहासतील एखाद्या सामन्यातील हे सर्वाधिक षटकार आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#sports
Next Article