महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रेकॉर्डब्रेक जीएसटी कमाई

06:00 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एप्रिल 2024 मध्ये एकूण जीएसटी संकलन 2.10 लाख कोटी

Advertisement

गेल्यावर्षी एप्रिलच्या तुलनेत 12.4 टक्के अधिक वाढ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशात सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू आहे आणि त्याच दरम्यान सरकारसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. निवडणुकीच्या काळात सरकारची तिजोरी जनतेने भरली आहे. सरकारला पहिल्यांदाच विक्रमी जीएसटी रक्कम मिळाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या 7 वर्षांत प्रथमच जीएसटी संकलन 2 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. एप्रिल 2024 मध्ये एकूण जीएसटी संकलन 2.10 लाख कोटी रुपये झाले असून ते गेल्या वषीच्या एप्रिलपेक्षा 12.4 टक्के अधिक आहे. यामध्ये सर्वात मोठा वाटा देशांतर्गत व्यवहारांचा असून तो गेल्या वषीच्या तुलनेत 13.4 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्यावषी एप्रिलमध्ये सरकारने 1.87 लाख कोटी ऊपयांचा जीएसटी जमा केला होता.

2017 मध्ये जीएसटी कायदा लागू झाल्यापासून त्याची रक्कम दरवषी वाढत आहे. 2017-18 मध्ये सरासरी जीएसटी संकलन 1 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी होते. त्याचवेळी, कोरोना कालावधीनंतर, 2020-21 पासून त्यात सातत्याने वाढ होत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात दरमहा सरासरी 1.51 लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या महिन्यातच जीएसटी संकलन 2 लाख कोटींहून अधिक झाले आहे. मार्च महिन्यातील 1.78 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ही रक्कम 17.81 टक्के अधिक आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी संकलन झाले असून, ते यावषी एप्रिलमध्ये 37,671 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वषीच्या तुलनेत हे प्रमाण 13 टक्के अधिक आहे.

जीएसटी विभागणी

एप्रिल महिन्यातील एकूण जीएसटी वसुलीपैकी यावेळी केंद्रीय जीएसटीचे संकलन 43,846 कोटी रुपये, राज्य जीएसटी 53,538 कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटी 99,623 कोटी रुपये होते. यामध्ये 37,826 कोटी रुपये आयात मालावर सापडले आहेत. याशिवाय जीएसटी उपकराच्या रूपात आणखी 13,260 कोटी रुपये जमा झाले आहेत.

जीएसटी संकलनाने प्रथमच 2 लाख कोटी ऊपयांचा टप्पा गाठल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून दिली आहे. जीएसटी संकलन हे अर्थव्यवस्थेच्या एकूण आरोग्याचे सूचक आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी संकलन हे मजबूत देशांतर्गत अर्थव्यवस्था दर्शवते, असे एप्रिल महिन्यातील जीएसटी संकलनाच्या आकडेवारीवर केपीएमजीचे राष्ट्रीय प्रमुख अभिषेक जैन म्हणाले.

 

एप्रिल 2024 मधील संकलन तपशील....

► केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी):        43,846 कोटी रु.

► राज्य वस्तू आणि सेवा कर (एसजीएसटी):       53,538 कोटी रु.

► एकात्मिक वस्तू व सेवा कर (आयजीएसटी): 99,623 कोटी रु.

► उपकर :                          13,260 कोटी रु.

► एकूण जीएसटी संकलन :            2,10,267 कोटी रु.

 

 

गेल्या 13 महिन्यातील जीएसटी कलेक्शन...

एप्रिल 2023      1.87 लाख कोटी रु.

मे 2023              1.57 लाख कोटी रु.

जून 2023                   1.61 लाख कोटी रु.

जुलै 2023                   1.65 लाख कोटी रु.

ऑगस्ट 2023        1.59 लाख कोटी रु.

सप्टेंबर 2023        1.63 लाख कोटी रु.

ऑक्टोबर 2023        1.72 लाख कोटी रु.

नोव्हेंबर 2023       1.68 लाख कोटी रु.

डिसेंबर 2023      1.65  लाख कोटी रु.

जानेवारी 2024         1.74 लाख कोटी रु.

फेब्रुवारी 2024        1.68 लाख कोटी रु.

मार्च 2024        1.78 लाख कोटी रु.

एप्रिल 2024     2.10 लाख कोटी रु.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article