महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रेकॉर्ड ब्रेक, तब्बल 41 टक्के जादा पाऊस

03:07 PM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्षिक सरासरीचे सर्व रेकॉर्डस मोडले : अंजुणेतून आज पाण्याचा विसर्ग : सर्वत्र वाऱ्यासह मुसळधार शक्य

Advertisement

विशेष प्रतिनिधी / पणजी

Advertisement

यंदाच्या पावसाने कहर केला. अवघ्या 45 दिवसांमध्ये अंजुणे धरण क्षेत्रात 101 इंच पावसाची नोंद झाली. वाळपइ= आज पाऊस शतक ओलांडणार आहे. सोमवारी सकाळीपर्यंत 24 तासातील पाऊस सरासरी 6.94 इंच तर एकूण पाऊस आता 80.37 इंच झाला आहे. आगामी 24 तासांमध्ये पुनश्च जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, अंजुणे धरण प्रकल्पातील पाण्याची पातळी 90.30 मीटर एवढी सोमवारी सायंकाळी झाली होती. आज सकाळी 10.30 वा. धरणाचे चारही दरवाजे खुले कऊन मोसमातील पहिल्या पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.

सध्या कोसळणाऱ्या पावसामुळे दिवसाकाठी इंचांची धाव शीघ्र गतीने वाढत आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत यावर्षी 41.6 टक्के जादा पाऊस झालेला आहे. अद्याप जुलैचे 15 दिवस जायचे आहेत. वार्षिक सरासरीमध्ये पावसाने यापूर्वीचे रेकॉर्डस मोडलेले आहेत. पावसाचा हा आक्रमकपणा असाच राहिला तर पुढील 8 दिवसांमध्ये इंचांचे शतक पार होऊ शकते.

रविवारची जोरदार फटकेबाजी 

जुलैमध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये 34.37 इंच एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 235 मिमी. पाऊस 7 जुलै रोजी पडला. त्यानंतर दुसऱ्यांदा सर्वाधिक नोंद 14 जुलै रोजी झाली. गेल्या रविवारी व कालच्या रविवारी अशा दोन्ही रविवारी पावसाने जोरदार फटकेबाजी लगावली. रविवारी सरासरी 6.25 इंच पावसाची गोव्यात नोंद झाली. वार्षिक तुलनेत यंदा सुमारे 13 दिवस गोव्याचा पाऊस पुढे आहे. यंदाच्या मोसमात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 23.67 इंच पाऊस जादा झालेला आहे.

जुलैमध्ये वार्षिक तुफान पाऊस पडत असतो. यंदा जुलैच्या सुऊवातीच्या चार दिवसांमध्ये फारच कमी पाऊस पडला. त्यानंतर पुढील आठवड्यात पावसाने जोर धरला आणि गोव्यात मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे. जुलैचे अद्याप 15 दिवस शिल्लक असून पावसाचा जोर ओसरण्याची कोणतीही चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत.

अंजुणे धरणाचे दरवाजे आज उघडणार

अंजुणे धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडलेला आहे. सोमवारी सकाळपर्यंत 101.50 इंच पावसाची विक्रमी नोंद झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 11 दिवस अगोदरच एवढी नोंद झाली व धरणही पूर्ण भरले आहे. सोमवारी सायंकाळी 90.30 मीटर एवढे पाणी धरणात होते. धरणामध्ये पाण्याची आवक अतिवेगाने वाढत आहे.

सांखळी, पर्ये, मोर्ले, केरीला सतर्कतेचा इशारा

आज मंगळवारी सकाळी 10.30 वा. अंजुणे धरणाचे चारही दरवाजे किंचित स्वऊपात उघडून पाण्याचा विसर्ग केला जाईल. जलस्रोत खात्याने सांखळी पालिका, कारापूर पंचायत, पर्ये पंचायत, मोर्ले पंचायत आणि केरी पंचायत क्षेत्रातील जनतेला सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. अंजुणे धरणावर सोमवारी विधीवत पूजा झाली, सांगणे झाले व आज मंगळवारी पाण्याच्या विसर्गाला प्रारंभ होईल.

गेल्या 24 तासांतील पाऊस व मोसमातील एकूण पाऊस (इंचामध्ये)

म्हापसा 7.3080.18
पेडणे8.0085
फोंडा6.0087
पणजी5.5076.31
जुने गोवे5.5076.50
सांखळी7.0091.15
वाळपई7.0095.50
काणकोण6.5081.50
दाबोळी4.0065.25
मडगाव5.2575.50
मुरगाव4.2568.75
केपे7.5080.75
सांगे6.5091.70

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article