महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मडगावातील फेस्ताच्या फेरीतील विक्रेत्यांना छायाचित्र घेऊन पावत्या

11:55 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुसूत्रता आणण्यासाठी पालिकेकडून पाऊल : मुख्याधिकाऱ्यांनी दिलेली माहिती

Advertisement

मडगाव : मडगाव पालिकेने आज शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या होली स्पिरीट चर्चच्या फेस्ताच्या फेरीत उभारण्यात येणाऱ्या स्टॉल्सबाबत सुसूत्रता आणण्यासाठी स्टॉलधारकांनी भरलेल्या शुल्काच्या पावत्या त्यांचे छायाचित्र घेऊन दिल्या असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी दिली. यापूर्वी सदर फेस्ताच्या फेरीत स्टॉल उभारलेल्यांना त्यांच्या मागील पावत्या पाहून स्टॉल बहाल करण्यास आपली कोणतीही हरकत नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी गुऊवारी त्यांची भेट घेतलेल्या स्टॉलधारकांना स्पष्ट केले. परंतु कोण एकटा सर्वांच्या पावत्या घेऊन आला, तर स्टॉल बहाल करण्यात येणार नाहीत. प्रत्येकाने व्यक्तीश: पालिकेत उपस्थित राहून संगणकाद्वारे छायाचित्र काढून दिल्या जाणाऱ्या पावत्या घेऊन जावे, असे मुख्याधिकाऱ्यांनी याप्रसंगी स्पष्टपणे सांगितले.

Advertisement

गुऊवारी सर्वांना उपस्थित राहणे शक्य न न झाल्यास शुक्रवारपर्यंत छायाचित्रासह पावत्या काढण्यास वेळ द्यावी अशी विनंती स्टॉलधारकांनी केली असता ती मुख्याधिकाऱ्यांनी मान्य केली. मात्र शुक्रवारी फेस्त आहे. हा एक दिवस अतिरिक्त देतो, त्याहून अधिक वेळ मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले. मागील वेळी पालिकेने आपल्या जागेत सुमारे 400 स्टॉल उभारण्यासाठी परवानगी दिली होती. यंदा त्याचप्रमाणे स्टॉल उभारले जाण्याची शक्यता आहे. एका स्टॉलमागे आठ दिवसांसाठी 8750 ऊ. अशी शुल्कआकारणी केली जात आहे. यात सोपो शुल्काचे 220 ऊ. समाविष्ट असल्याचे मुख्याधिकारी शंखवाळकर यांनी नजरेस आणून दिले. पालिकेच्या जागेतील या स्टॉलधारकांकडून सोपो कंत्राटदार सोपो वसूल करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. एसजीपीडीएच्या जागेत प्राधिकरणाकडून स्टॉल उभारण्यासाठी शुल्क वसुली केली जाते आणि व्यापार परवान्यापोटी पालिकेला सुमारे 5 लाख रु. फेडले जातात, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article