कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रियलमीची स्मार्ट फोनसह विविध उत्पादने होणार लाँच

06:49 AM Mar 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

2 फोन होणार लाँच : बडस्ची उत्पादनेही करणार सादर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

चिनी मोबाईल निर्माती कंपनी रियलमी यांनी अलीकडेच कृत्रिम बुद्धिमता वैशिष्ट्यासह नवा स्मार्ट फोन लाँच करण्याची घोषणा केली होती. पण आता कंपनीने नव्याने स्मार्ट फोनसोबत इतरही उत्पादने लाँच करण्याचे नियोजन केले आहे. 5 जी स्मार्ट फोनसह बड्स हे उत्पादन कंपनी लाँच करणार आहे.

स्मार्ट फोनअंतर्गत कंपनी पी 3 अल्ट्रा 5जी स्मार्ट फोन एआयने समृद्ध लाँच करणार आहे. गेमिंगची आवड असणाऱ्या ग्राहकांना हा फोन नक्कीच आवडणार आहे. सोबत रियलमी बड्स एअर 7 आणि रियलमी बड्स टी 200 लाईट ही दोन उत्पादनेदेखील लाँच करणार आहे. स्मार्ट फोनमध्ये मीडियाटेक डायमनसिटी 8350 अल्ट्राचीप असणार असून सर्वात स्लिक आकाराचा हा फोन असेल असाही दावा कंपनीने केला आहे.

कॅमेरा, बॅटरी

क्वाड कर्व्हड अमोलेड डिस्प्ले यात असणार असून 50 मेगापिक्सलचा एआय वैशिष्ट्याचा सोनी कॅमेरा असेल. 6 हजार एमएएच क्षमतेची बॅटरी दिली गेली असून 80 डब्ल्यूचा अल्ट्रा फास्ट चार्जर सोबत दिला जाणार आहे. 5 मिनिटाच्या चार्जवर ग्राहकाला 1.8 तासापर्यंत गेम खेळता येणार आहे. रियलमी पी 3 अल्ट्रा 5जी फोनची किंमत 23 हजार रुपयांपर्यंत (8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज) असणार आहे. यामध्ये रियलमी पी 3 हा परवडणाऱ्या दरात आणखी एक स्मार्ट फोन उपलब्ध केला जाणार आहे. ज्याची किंमत 15 हजार रुपयांच्या घरात असेल. 25 मार्चपासून स्मार्ट फोनची विक्री कंपनीच्या संकेतस्थळावर तसेच फ्लिपकार्ट व ऑफलाईन स्टोअरवर सुरू होणार आहे.

बड्स उत्पादने

यासोबत रियलमी बड्स एअर 7 हे उत्पादन कंपनी लाँच करणार असून 12.4 एमएमचा डीप बास ड्रायव्हर यात दिला आहे. उत्तम सुमधूर संगीत ऐकण्याचा आनंद ग्राहकाला या उत्पादनामार्फत घेता येणार आहे. 2799 इतकी किंमत याची असणार आहे. रियलमी बड्स टी 200 लाईट हे आणखी एक उत्पादन सादर केले जाणार असून 12.4 एमएम डायनॅमिक बास ड्रायव्हर यात दिला जाणार आहे. या उत्पादनाची किंमती 1119 रुपये इतकी राहणार आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article