रियलमी ‘नारझो 70’ भारतीय बाजारात दाखल
स्मार्टफोनची किंमत 18,999 पासून सुरु राहणार असल्याची कंपनीची माहिती
नवी दिल्ली :
चीनी टेक कंपनी रियलमीने भारतीय बाजारपेठेत ‘नारझो 70 आणि 70प्रो’ हे दोन मॉडेल 5जी मध्ये सादर केले आहेत. उत्तम फोटोग्राफी सुविधेसह स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स ओआयएस कॅमेरा, 6.7 इंच आकाराचा डिस्प्ले व 5000 एमएएच बॅटरी 67 डब्ल्यू फास्ट चार्जिंगची क्षमताही राहणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. सदरच्या स्मार्टफोनची किंमत ही 18,999 रुपये इतकी राहणार असल्याची माहिती आहे.
कंपनीने हा स्मार्टफोन दोन स्टोरेजमध्ये सादर केला आहे. 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व दुसरा 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजच्या सुविधेसह फोन सादर केला गेला आहे. स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ई कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनवर 19 मार्चच्या संध्याकाळी 6 पासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. कंपनीने ग्राहकांना स्मार्टफोनसोबत रियलमी बड्स टी 300 मोफत देण्याची सवलत दिलेली आहे. यासोबतच अत्याधुनिक सुविधा असणारा हा स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीला उतरणार असल्याचा दावा यावेळी कंपनीने केला आहे.
वैशिष्ट्यो...
? 6.7 इंचाचा अमोलेड फुल एचडी डिस्प्ले
? रियलमी युआय 5.0 ऑपरेटिंग सिस्टीम
? 5 हजार एमएएच बॅटरी
? किंमत 19 हजार रुपयांपासून सुरु
? रियलमी बडस् मोफत