रियलमीचा नारजो 80 स्मार्टफोन लाँच
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
चिनी स्मार्टफोन कंपनी रियलमी यांनी आपला नवा नारजो 80 हा नवा 5 जी स्मार्टफोन भारतीय बाजारामध्ये सादर केला आहे. मीडियाटेक डायमनसिटी चिपसह हा स्मार्टफोन असणार आहे. कंपनीने नारजो 80 प्रो व नारजो 80 एक्स हे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. धुळरोधक आणि पाणी रोधक अशा वैशिष्ट्यांसह येणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत 20 हजार रुपयापर्यंत असणार आहे. 8जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज स्मार्टफोनकरता वरील किंमत ग्राहकांना मोजावी लागणार आहे. यामध्ये 8जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनसाठी 21 हजार 499 रुपये तर 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसाठी 23 हजार 499 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत.
स्पीड सिल्वर आणि रेसिंग ग्रीन या दोन रंगांमध्ये स्मार्टफोन सादर केला जाणार आहे. सदरचे स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याचप्रमाणे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन यावर विक्रीकरता उपलब्ध झाले आहेत. या स्मार्टफोनला मीडियाटेक डायमनसिटी 7400 ची चीप बसवण्यात आली असून 6.7 इंचाचा हायपरग्लोव इस्पोर्टस डिस्प्ले देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे याची बॅटरी अधिक दमदार दिली गेली आहे. जवळपास 6 एमएएचची दमदार बॅटरी तसेच 80 डब्ल्यूचा फास्ट चार्जरही दिला आहे. 50 मेगापिक्सलचा सोनीचा प्रायमरी रियर कॅमेरा यामध्ये दिला असून 16 एमपीचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. सुरवातीला खरेदी करणाऱ्यांसाठी कंपनीने विविध ऑफर्स आणल्या आहेत.