‘रियलमी’ने 5 वर्षांत विकले 10 कोटींहून अधिक स्मार्टफोन
भारतामधील विक्रीची आकडेवारी : कंपनीच्या उपाध्यक्षांनी दिली माहिती
नवी दिल्ली :
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने आपल्या स्थापनेच्या अवघ्या पाच वर्षातच 2023 पर्यंत भारतात 10 कोटी स्मार्टफोन विकण्याचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीचे उपाध्यक्ष चेस शू म्हणाले की, ब्रँड या वर्षी आपली विक्री आणखी वाढवण्यासाठी फोन्सची कार्यक्षमता, फोटोग्राफी आणि डिझाइन सुधारण्यावर भर देणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले आहे.
अधिकाधिक प्रगत तंत्रज्ञानावर आधारीत फोन्स लाँच करण्याचा कंपनीचा ंमानस आहे. उपाध्यक्ष चेस म्हणाले की, उत्पादन सुधारण्याव्यतिरिक्त, कंपनी ब्रँडिंग सुधारण्यावर देखील लक्ष केंद्रित करेल. विशेषत: तरुण ग्राहकांच्या गरजा आणि प्राधान्यांची पूर्तता करणारा ब्रँड बनवण्याचे उद्दिष्ट आहे. उत्पादनातील नाविन्य आणि ब्रँडिंग अपग्रेडची ही दुहेरी रणनीती कंपनीला भारतीय बाजारपेठेत आघाडीवर राहण्यास मदत करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
वर्ष 2024 च्या रणनीतीवर, चेस म्हणाले की रियलमी 30 तंत्रज्ञान भागीदारांसोबत नाविन्यपूर्णतेसाठी सहकार्य करू इच्छिते आणि संशोधन आणि विकासमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
ते म्हणाले, ‘आम्ही संशोधन आणि विकासामध्ये 470 टक्क्यांनी लक्षणीय वाढ करू. ही तांत्रिक क्षमतांबद्दलची आमची बांधिलकी दर्शवते.