रियलमी जीटी8 प्रो 20 रोजी भारतात
200 मेगाफिक्सलसह अन्य अत्याधुनिक फिचर्ससह
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टेक कंपनी रियलमी 20 नोव्हेंबर रोजी भारतात मध्यम बजेट श्रेणीत आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन रियलमी जीटी8 प्रो लाच करणार आहे. फोनचा लाँचिंग इव्हेंट दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. या फोनमध्ये शक्तिशाली कामगिरी, प्रीमियम डिझाइन, हाय-एंड डिस्प्ले आणि प्रगत कॅमेरा सिस्टम आहे. कंपनीचा दावा आहे की हा आतापर्यंतचा सर्वात प्रगत रियलमी फोन असेल, जो फोटोग्राफी आणि गेमिंग दोन्हीमध्ये व्यावसायिक दर्जाचा अनुभव देतो.
या स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा आणि 7000 एमएएच बॅटरी असेल. कंपनीने अलीकडेच आपल्या होम मार्केट चीनमध्ये 5 स्टोरेज व्हेरिएंटमध्ये रियलमी जीटी8 प्रो लाँच केल्यानंतर त्यांची सुरुवातीची किंमत 2899 युआन (अंदाजे 35,850) आहे. भारतात तो 35 हजारच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला.