रिलयमी जीटी 6 टी स्मार्टफोन 22 रोजी होणार लाँच
100 डब्लू चार्जर, स्नॅपड्रॉगन 7 प्लस जेन3 प्रोसेसरसह अन्य सुविधा
नवी दिल्ली :
टेक कंपनी रियलमी ही येत्या 22 मे रोजी बजटमधील नवीन स्मार्टफोन ‘रियलमी जीटी 6टी’ हा 5 जी मध्ये स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. या संदर्भातील माहिती कंपनीने एक्सवर दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सदर स्मार्टफोनमध्ये 100 डब्लू फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5500 एमएएच बॅटरी, 50 एमपी कॅमेरा आणि 12जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज मिळू शकतो. यासोबतच सदरच्या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत ही 25,000 रुपये राहणार असल्याची कंपनीची माहिती आहे.
अन्य फिचर्स :
? डिस्प्ले : रियलमी जीटी 6 टी स्मार्टफोनमध्ये 120 एचझेड रिफ्रेश रेट आणि 2400ते1080 पिक्सेल रिझोल्यूशनसोबत 6.78 एचडी डिस्प्ले
? मुख्य कॅमेरा : फोटोग्राफीसाठी , रियलमी जीटी 6 टी च्या मागील पॅनेलवरील डबल कॅमेरा सेटअपसह 50 एमपीचा सेन्सर व 8 एमपी डेप्थ मिळणार
? सिस्टम : स्मार्टफोनमध्ये अड्रॉईड 14 वर आधारीत क्लालकॉम स्नॅपड्रगन 7 प्लस जेन3 चिपसेट राहणार
? बॅटरी : सदरच्या स्मार्टफोनमध्ये 5500 एमएएच बॅटरीची सुविधा मिळणार आहे.