रियलमी सी85 5जी स्मार्टफोन लाँच
7 हजार एमएएचची दमदार बॅटरी, परवडणाऱ्या किमतीत सादर
चेन्नई
चीनी कंपनी रियलमीचा सी85 5 जी स्मार्टफोन भारतात नुकताच लाँच झाला आहे. अनेक वैशिष्ट्यो यात देण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे 7000 एमएएमची दमदार बॅटरी यात दिली असून किंमत 15 हजार रुपयांच्या घरात असणार आहे. परवडणाऱ्या किमतीतील विविध सुविधांचा हा फोन चाहत्यांना निश्चितच आवडणार असल्याचा विश्वास कंपनीला आहे.
मध्यम किंमत प्रकारात स्टायलिश स्वरुपात सदरचा स्मार्टफोन सादर करण्यात आला असून उत्तम बॅटरी दिली गेली आहे. 7000 एमएएच क्षमतेची बॅटरी यात असून 45 डब्ल्यूचा फास्ट चार्जर सोबत दिला गेला आहे. ज्यांना फोनवर जास्त वेळ काम करायचे आहे अशांसाठी बॅटरीक्षमता परफेक्ट असणारा हा स्मार्टफोन आहे. सदरची बॅटरी 2 दिवस वापरता येते.
किमत आणि स्टोरेज
या फोनची किमतही 15 हजार रुपयांच्या घरात असेल. 4 जीबी व 128 जीबी स्टोरेजसह सदरचा फोन सादर केला असून 50 मेगापिक्सलचा दमदार कॅमेराही असेल. मीडियाटेक डायमेनसिटी 6300 चा प्रोसेसर फोनला असणार असून 6.8 इंचाचा एचडी प्लस एलसिडी डिस्प्ले आहे.
वैशिष्ट्यो:
►6.8 इंचाचा एचडी प्लस व एलसीडी डिस्प्ले
►मीडियाटेक डायमेनसिटी 6300 चा प्रोसेसर
►सोनी आयएमएक्स 852 सेन्सरचा 50 एमपी व 8 एमपीचा फ्रंट कॅमेरा
►7000 एमएएच बॅटरी
►4 जीबी व 128 जीबी, 6 जीबी व 128 जीबी स्टोरेज
►पाणी रोधक